मुंबईत सिलिंडर स्फोटामुळे घराला आग लागून तीन ठार
By Admin | Updated: February 6, 2016 18:12 IST2016-02-06T18:12:23+5:302016-02-06T18:12:23+5:30
गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट येथे ही दुर्घटना घडली आहे

मुंबईत सिलिंडर स्फोटामुळे घराला आग लागून तीन ठार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट येथे ही दुर्घटना घडली आहे. मरण पावलेल्यांमध्ये एक महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे.
आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. तीन जणांना बाहेर काढून राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
परंतु, सलमा बेलीम (वय ४० वर्षे), मोहम्मद बेलीम (८ वर्षे) व मिराज बेलीम (१५ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.