भीती दाखवत तीन कोटींचे दागिने लांबवले

By Admin | Updated: April 4, 2017 03:21 IST2017-04-04T03:21:58+5:302017-04-04T03:21:58+5:30

हिरेजडीत दागदागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी राजेश तुळसीदास नाखुवा या कथित डिटेक्टिव्हला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली

Three crores of jewelery worth mentioning fear | भीती दाखवत तीन कोटींचे दागिने लांबवले

भीती दाखवत तीन कोटींचे दागिने लांबवले

मुंबई : पतीच्या कार्यालयासह घरावर आयकर विभागाची कारवाई होणार असल्याची बतावणी करून एका व्यावसायिकाच्या पत्नीकडील तीन कोटी रुपयांच्या हिरेजडीत दागदागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी राजेश तुळसीदास नाखुवा या कथित डिटेक्टिव्हला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीने तक्रारदार महिलेचे दागिने परत केल्याचा दावा न्यायालयात खोटा ठरल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द केल्याने यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तक्र ारदार महिला पती व लहान मुलीसह राहत असून तिची राजेश नाखुवा, दीपक देवजी भानुशली, मीरा ठक्कर उर्फ मीरा चंदन यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर व्यावसायिकाच्या पत्नीची फसवणूक करून तिला लुटण्याच्या उद्देशाने राजेश, दीपक आणि मीरा चंदन यांनी कट रचून तक्रारदार महिलेला तिच्या पतीचे कार्यालयातील सीए असलेल्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे सांगून त्याबाबतचे पुरावे देण्याचा बहाणा करून महिलेकडून चार लाख रुपये उकळले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा राजेश महिलेच्या घरी गेला व तुमच्या पतीच्या कार्यालयावर व घरावर आयकर विभागाचा छापा पडणार असल्याचे सांगून त्या महिलेकडील दागदागिने व इतर ऐवज सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देत महिलेच्या बँक लॉकरमध्ये असलेले तीन कोटींचे दागिने स्वत:कडे ठेवले. मात्र आयकर विभागाचा छापा न पडल्याने तक्रारदार महिलेने राजेशकडे तिचे दागिने मागितले. मात्र राजेश याने महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत कुटुंबाला ठार मारण्याची तसेच मुलीचे अपहरण करण्याची धमकी देऊन तिच्याकडे आणखी ५0 लाख रुपये खंडणीची मागणी केली.
घाबरलेल्या महिलेने या प्रकाराची माहिती पतीला दिल्यानंतर पतीने या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. राजेश, दीपक व मीरा चंदन यांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. दीपक व मीरा चंदन यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला, मात्र राजेश याचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. कारण त्याने न्यायालयाला तक्र ारदार महिलेचे दागिने परत केल्याची खोटी माहिती दिली होती. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली (प्रतिनिधी)
दीपक व मीरा चंदन यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला, मात्र राजेश याचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. कारण त्याने न्यायालयाला तक्रारदार महिलेचे दागिने परत केल्याची खोटी माहिती दिली होती.

Web Title: Three crores of jewelery worth mentioning fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.