परळीत मालगाडीचे तीन डबे घसरले

By Admin | Updated: January 20, 2016 02:38 IST2016-01-20T02:38:32+5:302016-01-20T02:38:32+5:30

येथील रेल्वेस्थानकातून लातूर रोडकडे जाणाऱ्या मालवाहतूक गाडीचे तीन डबे घसरल्याची घटना परळी-घाटनांदूर मार्गावर मंगळवारी सकाळी पाऊने नऊच्या सुमारास घडली.

Three coaches of the goods train collapsed in Paroli | परळीत मालगाडीचे तीन डबे घसरले

परळीत मालगाडीचे तीन डबे घसरले

परळी (जि. बीड) : येथील रेल्वेस्थानकातून लातूर रोडकडे जाणाऱ्या मालवाहतूक गाडीचे तीन डबे घसरल्याची घटना परळी-घाटनांदूर मार्गावर मंगळवारी सकाळी पाऊने नऊच्या सुमारास घडली.
अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दुरुस्तीचे काम सांयकाळपर्यंत सुरु असल्याने एक एक्स्प्रेस सिकंदराबाद मार्गे वळविण्यात आली तर पंढपुरहून येणारी रेल्वे परळीत येऊ शकली नाही.
परळी-घाटनांदूर मार्गावरील मालेवाडी, लेंडेवाडीजवळील रेल्वेमार्गावरील डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. सोमवारी त्यासाठी ब्लास्टिंगही करण्यात आले. ब्लास्टिंगच्या दगडामुळे अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three coaches of the goods train collapsed in Paroli