बालसुधारगृहातील तीन मुले बेपत्ता?
By Admin | Updated: October 8, 2016 04:27 IST2016-10-08T04:27:57+5:302016-10-08T04:27:57+5:30
शहरातील कचेरीपाडा येथील बालसुधार व निरीक्षणगृहात विविध गुन्ह्यांत अटक केलेली तीन मुले पळाली

बालसुधारगृहातील तीन मुले बेपत्ता?
भिवंडी : शहरातील कचेरीपाडा येथील बालसुधार व निरीक्षणगृहात विविध गुन्ह्यांत अटक केलेली तीन मुले पळाली नसून ती बेपत्ता झाली असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी दिली. न्यायाधीशांच्या आदेशाने मुले बेपत्ता झाल्याची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कचेरीपाडा येथे हे बालसुधारगृह आहे. येथे घरफोडीमधील काशिमीरा येथील आरोपी इस्माईल रईस शेख (१७), वसई येथील सुरज ऊर्फ कालू मोहनसिंग (१६) तसेच कल्याण येथील खून प्रकरणातील आरोपी प्रवीण रमेश वाघे (१६) हे तिघे रात्री पावणेदहाच्या सुमारास सिमेंटचा पत्रा तोडून बाहेर पडले आणि तेथून पळून गेले. सुधारगृहातील न्यायाधीशांच्या आदेशाने केअरटेकर संतोष शेळके यांनी ही मुले बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसात केली. (प्रतिनिधी)
>पाच वर्षांत या बालसुधारगृहातून १८ मुले पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. पाच महिन्यांपासून बालसुधारगृहातील अधीक्षकपद रिक्त आहे. वारंवार मुले पळून जात असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.