चिखलीतील बेपत्ता तीन मुले मुंबईत सापडली
By Admin | Updated: March 6, 2017 05:13 IST2017-03-06T05:13:53+5:302017-03-06T05:13:53+5:30
चिखलीतून बेपत्ता झालेली तीन अल्पवयीन मुले मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्थानकावर सापडली.

चिखलीतील बेपत्ता तीन मुले मुंबईत सापडली
पिंपरी : चिखलीतून बेपत्ता झालेली तीन अल्पवयीन मुले मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्थानकावर सापडली. निगडी पोलिसांनी २४ तासांच्या आत मुलांना शोधून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. शुक्रवारी ही मुले बेपत्ता झाली होती.
चिखली, कुदळवाडी येथे घराबाहेर खेळणारी निखिल भंडारी (११), सत्यम श्रीनिवास राव (८), मनोज श्रीनिवास राव (५) ही मुले शुक्रवारी सायंकाळी अचानक गायब झाली. रात्री नऊनंतरही ते न परतल्याने पालक चिंताग्रस्त झाले होते. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. निगडी पोलिसांनी पुणे, लोणावळा, कल्याण, सीएसटी रेल्वे स्थानकावर त्यांची माहिती पाठविली. शनिवारी दुपारी ही मुले सीएसटी रेल्वे स्थानकावर आढळून आली. (प्रतिनिधी)