जुन्नरमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: November 1, 2016 12:29 IST2016-11-01T12:17:45+5:302016-11-01T12:29:50+5:30

अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

Three children died in the same family due to poisoning in Junnar | जुन्नरमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

जुन्नरमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 1 - अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. जुन्नरमधील ही घटना आहे. मृतांमध्ये तीनही मुलांचा समावेश आहे. राहुल फुलमाळी, साईराज फुलमाळी आणि धनराज फुलमाळी अशी मृत पावलेल्या मुलांची नावे असून, ही मुले 4-8 वयोगटातील असल्याची माहिती मिळते आहे.
 
तर प्रकृती खालावलेल्या तीन जणांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी फुलमाळी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
 
सोमवारी रात्री जेवणानंतर दोन मुलांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला तर एकाने  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. मात्र, विषबाधा होण्यामागचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. 
 
दरम्यान, मुलांनी फराळ केल्यानंतर बाहेरुन आणलेली मिठाईदेखील खाल्ली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 
 

Web Title: Three children died in the same family due to poisoning in Junnar