खंडाळ्याजवळ ३ बस एकमेकांवर आदळून अपघात, ७ जखमी
By Admin | Updated: December 26, 2014 12:34 IST2014-12-26T10:00:35+5:302014-12-26T12:34:49+5:30
मुंबई- पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ तीन खासगी बस एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत.

खंडाळ्याजवळ ३ बस एकमेकांवर आदळून अपघात, ७ जखमी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ - मुंबई- पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ तीन खासगी बसेस एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा अपघात झाला असूनत्यामुळे हायवेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्याचे समजते. मुंबईकडे जाणा-या वाहतूकीवरही अपघातामुळे परिणाम झाला असून वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळवण्यात आली आहे.