युवतीच्या खून प्रकरणी तिघांना अटक

By Admin | Updated: May 9, 2014 22:24 IST2014-05-09T19:26:58+5:302014-05-09T22:24:25+5:30

गुन्‘ांंमध्ये मदत करण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानेच साथीदारांकरवी युवतीचा खून करवल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

Three arrested in the murder case of the girl | युवतीच्या खून प्रकरणी तिघांना अटक

युवतीच्या खून प्रकरणी तिघांना अटक

प्रियकरच मुख्य सूत्रधार : फसवणुकीच्या गुन्‘ात मदतीस नकार दिल्याने कृत्य
पुणे : नायजेरियन फ्रॉडसारख्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्‘ांंमध्ये मदत करण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानेच साथीदारांकरवी युवतीचा खून करवल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तळेगाव रेल्वे स्थानकावर बुधवारी सुटकेसमध्येयुवतीचा मृतदेह आढळला होता. सराईत गुन्हेगार असलेल्या या प्रियकरासह तिघांना रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे. मारेकरी आणि युवती मुंबईचे असल्याचेही निष्पन्न झाल्याची माहिती पुणे विभागाचे अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली.
राणी सभाजीत सिंग (रा. हिंमतनगर, हनुमान मंदिराजवळ, वडाळा (पू.) मुंबई) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष विष्णू जुगदर (वय ३१, रा. हिंमतनगर, विद्या कॉलेजच्या बाजूला, वडाळा, मुंबई), राहुल रवींद्र बरई (वय २१, रा. जय महाराष्ट्र नगर, सायन कोळीवाडा, वडाळा), ईशान हमजान अली कुरेशी (वय २१, रा. भारतीय कमलानगर, एस. पी. रोड, ॲन्टॉप हिल, वडाळा) यांना अटक करण्यात आली आहे. पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष विवाहित असून त्याचे राणीसोबत प्रेमसंबंध होते. ते एकाच भागात राहत. संतोषचा नालासोपार्‍यात एक फ्लॅट असून तेथे राहुल राहत होता. संतोषने तिला राहुलसोबत फ्लॅटवरच ठेवले. नायजेरियन फ्रॉडसारख्या अनेक गुन्‘ांमध्ये सहभागी असलेल्या संतोष आणि राहूलने राणीवर या कामात सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. तिने स्पष्ट नकार दिल्यावर संतोषच्या सांगण्यावरून राहुल व त्याचा मित्र ईशान यांनी राणीचा ओढणीने गळा आवळून खून केला. शवविच्छेदनाच्या अहवालात राणीची मान मोडल्याचे निष्पन्न झाले होते. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.

राणीचा खून केल्यानंतर मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर राहुल आणि ईशान यांनी मुंबईमधून एक टॅक्सी करून तळेगाव गाठले. तळेगाव रेल्वे स्थानकावर ही बॅग ठेवून आरोपी पुन्हा मुंबईला परतले. बॅगेत मृतदेह आढळल्यावर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी श्वान पथकासह घटनास्थळी भेट दिली होती. त्यावेळी काही महत्त्वाचे दुवे हाती लागले होते. त्या आधारे पोलिसांनी नालासोपारामध्ये या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून संतोषला बेड्या ठोकण्यात आल्या.

संतोष सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ॲन्टॉप हिल, वडाळा, ट्रक टर्मिनल या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी आणि मारामारीचेही गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Three arrested in the murder case of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.