माहिम विद्युत उपकेंद्रातील बॅटरी चोरी प्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: July 1, 2016 17:05 IST2016-07-01T17:05:12+5:302016-07-01T17:05:12+5:30
पश्चिम रेल्वेच्या माहिम विद्युत उपकेंद्रातील बॅटरी चोरी प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

माहिम विद्युत उपकेंद्रातील बॅटरी चोरी प्रकरणी तिघांना अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - पश्चिम रेल्वेच्या माहिम विद्युत उपकेंद्रातील बॅटरी चोरी प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात १९ तारखेला माहीम स्थानकाजवळील विद्युत उपकेंद्रातून १८ बॅटरींची चोरी झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी तब्बल ७० लोकल फेऱ्या रद्द झाल्याने आणि १00 गाड्यांना उशीर झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. दरम्यान, याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाकडून अटक तीन जणांना अटक करण्यात आली आहे.