बलात्कार प्रकरणी तिघांना कोठडी

By Admin | Updated: June 11, 2016 03:56 IST2016-06-11T03:56:48+5:302016-06-11T03:56:48+5:30

येथील शास्त्री वॉर्डात भाड्याने राहणाऱ्या वडनेरच्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित तीन

Three accused in rape case | बलात्कार प्रकरणी तिघांना कोठडी

बलात्कार प्रकरणी तिघांना कोठडी

हिंगणघाट (वर्धा) : येथील शास्त्री वॉर्डात भाड्याने राहणाऱ्या वडनेरच्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुळची वडनेर येथील २२ वर्षीय महिला हिंगणघाटच्या शास्त्री वॉर्डात भाड्याने राहते. ८ जूनला रात्री १० वाजताच्या दरम्यान ती, तिचा दिर व त्याचा मित्र सचिन डफरे यांच्या सोबत वणा नदी परिसरात फिरायला गेली होती. अशातच अनोळखी पाचजण मोटारसायकलने त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी त्या महिलेच्या दिराला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पिडीत महिलेवर बलात्कार केला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Three accused in rape case