भारत भ्रमणदरम्यान तिघांचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: June 13, 2014 01:25 IST2014-06-13T01:25:22+5:302014-06-13T01:25:22+5:30
भारत भ्रमणावर निघालेले परमात्मा एक सेवक मंडळाच्या जत्थ्यातील एका खासगी वाहनाला अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दि.७ जून रोजी राजस्थान

भारत भ्रमणदरम्यान तिघांचा अपघाती मृत्यू
माणूसकी हरवली : मृतदेह पाठवून सहकारी भारत भ्रमणावर पुढे
मोहाडी (जि.भंडारा) : भारत भ्रमणावर निघालेले परमात्मा एक सेवक मंडळाच्या जत्थ्यातील एका खासगी वाहनाला अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दि.७ जून रोजी राजस्थान येथे घडली असून बुधवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव मोहाडीत पाठविण्यात आले.
माणुसकी हरवलेल्या सहकारी मृतदेह घेऊन परत येण्यापेक्षा पुढील प्रवासाला निघून गेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान मृताच्या कुटुंबीयांनी पत्रपरिषद घेऊन भारत भ्रमंतीवर निघालेल्या सर्वच जणांविरुद्ध कारवाई करावी, या आशयाची तक्रार मोहाडीत पोलीस ठाण्यात दिली आहे.
मोहाडी येथील परमात्मा एक सेवक मंडळाचे ७० सदस्य आठ खासगी वाहनाने भारतभ्रमणासाठी गेले होते. त्यापैकी सुमो क्र. एमएच-४३/ए-७५३५ या वाहनाला दि.७ जून रोजी उदयपूरजवळ अपघात झाला. या अपघातात प्रभुदास डोये (५०) रा.सकरला, शैलेश टिकापाचे (२५) रा. अकोला (टोला) व शामराव मानकर (५४) रा.मोहाडी यांचा मृत्यु झाला. फिरायला गेलेल्या अन्य सहकाऱ्यांनी रूग्णवाहिकेतून मृतदेह मोहाडीला पाठवून भारतभ्रमणाचा प्रवास सुरूच ठेवला आहे.
अपघात झाल्यानंतर त्याची कुठलिही सूचना न देता मृतदेह पाठवून दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.मोहाडी तालुक्यात परमात्मा एक सेवक मंडळाचे हजारे सेवक आहेत. जे या धर्माची दिक्षा घेऊन सेवक बनतात त्यांना ४२ दिवसांची तपस्या पूर्ण करण्यासाठी सांगण्यात येते. मोहाडी येथील शामराव मानकर यांना काही व्याधी असल्यामुळे त्यांनी लता बुरडे (मांत्रिक) यांना उपाय विचारला असता तिने ४२ दिवसासाठी भारत भ्रमणासाठी फिरायला जावे लागेल, असे सांगितले. याप्रकारे ७० सेवकांचा जत्था फिरायला गेला आहे. एवढी मोठी घटना घडूनही अन्य सहकारी त्यांच्यासोबत न येता पुढच्या प्रवासाला निघून गेले. त्यांचे मृतहदेह सकरला व अकोला (टोला) येथे पाठवून देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)