तरूणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरूणाला अटक
By Admin | Updated: January 17, 2017 21:18 IST2017-01-17T21:18:07+5:302017-01-17T21:18:07+5:30
फेसबुकवर मैत्री झालेल्या तरूणीचा विनयभंग करुन तिच्या नातेवाईकांकडे ७० हजार रुपयांची खंडणी मागणा-या व खंडणी न दिल्यास फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देणा-याला

तरूणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरूणाला अटक
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 - फेसबुकवर मैत्री झालेल्या तरूणीचा विनयभंग करुन तिच्या नातेवाईकांकडे ७० हजार रुपयांची खंडणी मागणा-या व खंडणी न दिल्यास फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देणा-या तरूणाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली.
पियुष अरूण राजूरकर (वय २३, रा. वारजे) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी २३ वर्षाच्या तरूणीने फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर २०१५ ते ४ जानेवारी २०१७ या कालावधीत घडली.
तरूणीशी राजूरकर याने फेसबुकवर मैत्री केली. त्याने तिच्या नातेवाईकाला ७० हजार रुपये द्या नाहीतर तिच्याबरोबर काढलेले फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याचे तरूणीने फिर्यादीत म्हटले केले आहे.
याप्रकरणी राजूरकर याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने तरुणीचे काढलेले फोटो जप्त करायचे आहे़ त्याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने त्याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.