धमकी देऊन तीस हजारांची रोकड लांबविली
By Admin | Updated: August 16, 2016 15:12 IST2016-08-16T15:12:07+5:302016-08-16T15:12:23+5:30
तीन चोरट्यांनी एका व्यक्तीला ठार मारण्याची धमकी देत ३० हजार रुपये लांबवल्याची घटना पुण्यातील भोसरी घडली.

धमकी देऊन तीस हजारांची रोकड लांबविली
>ऑनलाइन लोकमत
भोसरी (पुणे), दि. १६ - भोसरी येथे तीन चोरट्यांनी एका व्यक्तीला ठार मारण्याची धमकी देत ३० हजार रुपये लांबवल्याची घटना घडली आहे.
मोटारगाडीतून जात असलेल्या सिद्धेश्वर ज्ञानेश्वर महाजन या फिर्यादीला दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी वहिनीच्या गाडीला कट का मारला अशी विचारणा करत ठार मारण्याची धमकी देऊन तीस हजारांची रोकड पळवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाजन हे भोसरी येथील उड्डाणपूलावरून राजमाता हायस्कूलच्या दिशेने जात होते़ पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी महाजन यांना आमच्या वहीनीच्या गाडीला कट का मारला अशी विचारणा केली. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली़, तसेच महाजन यांच्याकडून जबरदस्तीने तीस हजार रूपयांची रोकड पळवून घेऊन गेले. लुटण्यात आलेला तरूण अर्थमंत्र्यांच्या सचिवाचा मित्र असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड करीत आहेत.