माहिती अधिकारात माहिती मागवल्याने भावंडांना मारहाण

By Admin | Updated: April 5, 2017 05:41 IST2017-04-05T05:41:45+5:302017-04-05T05:41:45+5:30

शास्त्रीनगर परिसरातील पोर्ट ट्रस्ट येथील बांधकामाबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात फिरोज घट्टे यांनी अलिबाग नगरपालिकेकडे मागितली होती.

Threats to siblings to seek information | माहिती अधिकारात माहिती मागवल्याने भावंडांना मारहाण

माहिती अधिकारात माहिती मागवल्याने भावंडांना मारहाण


अलिबाग : शास्त्रीनगर परिसरातील पोर्ट ट्रस्ट येथील बांधकामाबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात फिरोज घट्टे यांनी अलिबाग नगरपालिकेकडे मागितली होती. याचा राग येऊन सात आरोपींनी फिरोज घट्टे यांच्यासह त्यांच्या भावाला मारहाण केली. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोर्ट ट्रस्ट येथे सुरू असलेले बांधकाम अनधिकृत बांधकाम आहे की अधिकृत आहे, याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात घट्टे यांनी अलिबाग नगरपालिकेकडे मागितली होती. त्यामुळे तेथील बांधकाम बंद पडले. याचा राग आल्याने आरोपींनी घट्टे यांना फोन करून सिद्धार्थनगर येथे बोलावून घेतले. घट्टे बंधू तेथे गेले असता, आरोपींची त्यांच्यासोबत बाचाबाची झाली. त्यानंतर सात जणांनी घट्टे बंधूंना मारहाण केली, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Threats to siblings to seek information