शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; शिवसैनिक सांभाळतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 08:55 IST

आम्ही कुणालाही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. आम्ही शांत आहोत म्हणून लढायला विसरलो असं नाही असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

नवी मुंबई - मला पोलिसांकडून काही इनपुट्स आले, बाहेर पडू नका. कुणी हल्ला करू शकतं. विद्यापीठात आंदोलन करताना पोलीस माझ्या बाजूला आले. तुम्ही सुरक्षित आहात का? अशी विचारणा झाली. पोलिसांकडे काही माहिती असल्याने ते अलर्टवर आहेत असं कळालं. माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल, हल्ला होऊ शकतो. कमरेखालचे वार केले जाऊ शकतात त्यापलीकडे मला अडवण्यासाठी दुसरं काही केले जाऊ शकत नाही. मला चिंता आहे की, माझ्याकडे ५ वर्षाचं बाळ आहे. ते शिवसेनेला दत्तक देते. सगळे शिवसैनिक मामा म्हणून बाळाला सांभाळतील. उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील. आम्ही करेंगे और मरेंगे याच भावनेने लढतोय अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही कुणालाही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. आम्ही शांत आहोत म्हणून लढायला विसरलो असं नाही. उद्धव ठाकरे हे संयमी नेते आहेत. माझ्या सोसायटीखाली २ कॉन्स्टेबल येऊन बसले. मला सुरक्षा द्यायचं म्हणतायेत. मी याबाबत उद्धव ठाकरेंना माहिती दिली. दिवसभर माझ्यावर तणाव होता. माणूस म्हणून भावनिक असतो. जे होईल ते होईल. बाळाची चिंता वाटली मग नंतर विचार केला त्याची जबाबदारी घ्यायला शिवसैनिक खंबीर आहेत असं त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघातज्या संविधानानं तुमच्या आमच्या मनातील सरकार निवडण्याचा अधिकार दिला. काय काय आक्रित बघायला मिळतंय. माझ्या भावासमोरचा माईक काढून घेतायेत. कागद लिहून वाचायला देतात. माझा भाऊ प्रचंड विद्वान आहे. कॉपी करून पास झालाय का? माझा भाऊ ढ वाटतो का? आमचे राज ठाकरे यांच्यावर मिमिक्री केल्यामुळे किती गुन्हे दाखल केले? माझ्यावर गुन्हे दाखल केल्याने मी शांत होईन असं वाटत असेल तर भ्रमात आहे. जागे व्हा अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. 

तसेच मी सामान्य घरातील महिला आहे. माझ्याकडे पैसा नाही. त्यामुळे मी घाबरत नाही. सुषमा अंधारे शिवसेना उभी करण्याची कामी येत असेल तर गर्व आहे. माझ्या मुलीला मी दत्तक देते. सगळे शिवसैनिक तिचा सांभाळ करतील, कन्यादान कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे करतील असंही अंधारे यांनी म्हटलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे