गणपतराव देशमुख यांना पुन्हा धमकीचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 01:23 IST2016-10-21T01:23:27+5:302016-10-21T01:23:27+5:30

शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख यांना खंडणीसाठी आलेल्या धमकीपत्रांच्या निषेधार्थ सोमवारी मूकमोर्चा काढल्यानंतर बुधवारी (दि. १९) पुन्हा

Threatening letter to Ganpatrao Deshmukh again | गणपतराव देशमुख यांना पुन्हा धमकीचे पत्र

गणपतराव देशमुख यांना पुन्हा धमकीचे पत्र

सांगोला : शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख यांना खंडणीसाठी आलेल्या धमकीपत्रांच्या निषेधार्थ सोमवारी मूकमोर्चा काढल्यानंतर बुधवारी (दि. १९) पुन्हा तशाच आशयाचे ११वे पत्र प्राप्त झाल्याने पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे. आ. देशमुख
यांनी पोलीस संरक्षण नाकारले असले तरी, पोलीस प्रशासनाने मात्र या पत्रांची गंभीर दखल घेत त्यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढविला आहे.
निनावी पत्रे पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आ. देशमुख यांना शुक्रवार २१ आॅक्टोबरपर्यंत १० कोटी द्या. अन्यथा, २८ आॅक्टोबर
रोजी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ठार करू, अशी धमकी दिल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते आ. देशमुख यांना एप्रिलपासून आतापर्यंत धमकीची ११ पत्रे आली आहेत. हिंदी व मराठी भाषांमधील या धमकीपत्रांमध्ये १० कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात येत आहे. ही सर्व पत्रे त्यांनी चौकशीसाठी पोलिसांकडे दिली आहेत.
तर सांगोल्यात नागरिकांनी सोमवारी
मूकमोर्चा काढून या धमकीपत्रांचा छडा लावण्याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Threatening letter to Ganpatrao Deshmukh again