अण्णांना पुन्हा धमकीचे पत्र

By Admin | Updated: August 21, 2015 00:37 IST2015-08-21T00:37:47+5:302015-08-21T00:37:47+5:30

ज्येष्ठ समाजसवक अण्णा हजारे यांना गुरुवारी जीवे मारण्याच्या धमकीचे आणखी एक पत्र आले आहे. ‘मी शार्पशूटर आहे. तुमची सुपारी घेतली आहे,

Threatening letter to Anna again | अण्णांना पुन्हा धमकीचे पत्र

अण्णांना पुन्हा धमकीचे पत्र

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसवक अण्णा हजारे यांना गुरुवारी जीवे मारण्याच्या धमकीचे आणखी एक पत्र आले आहे. ‘मी शार्पशूटर आहे. तुमची सुपारी घेतली आहे,’ या आशयाची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. याबाबत पारनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
हजारे यांच्या राळेगण येथील कार्यालयाला गुरुवारी मिळालेले हे पत्र हिंदी भाषेत असून धमकी देणाऱ्याने पत्रावर स्वत:चे छायाचित्रही दिले आहे. ‘महादेव पांचाळ’ या नावानिशी पाठविलेल्या या पत्रावर लातूर जिल्ह्यातील दिंडेगावचा पत्ता आहे. उस्मानाबाद कार्यालयातून ते पोस्ट झाल्याचे शिक्क्यावरून स्पष्ट होते.
‘हे माझे दुसरे पत्र आहे. काही दिवसांत आपण माझ्या हातून सुटणार नाहीत. कारण मी तुमची सुपारी घेतली आहे,’ असा मजकूर त्यात आहे.

Web Title: Threatening letter to Anna again