शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीला नदीत फेकण्याची धमकी; अजित पवारांचे मंत्री भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:49 IST

dharmarao baba atram hilarious statement: गेली ५० वर्षे मी काम करत आहे. आता हे मध्येच येऊन असे वातावरण तयार करणार असतील तर त्यांची वाट लावायचे काम मी करणार, असा इशारा आत्राम यांनी दिला आहे.

अजित पवारांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री शरद पवारांच्या गटातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आत्राम यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुलीला नदीत फेकेन. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, असे म्हटले आहे. यावरून आता राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. माझ्याकडे ती गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझे घर फोडण्याचे काम करत असल्याचा आरोप आत्राम यांनी शरद पवारांवर केला. 

विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचे काम केले जात आहे. जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमची कशी होणार, असा सवाल करत माझ्याकडे दुधारी तलवार असून माझ्या वाटेला गेला तर ती म्यानातून बाहेर काढेन, असे वक्तव्य आत्राम यांनी केला आहे. याचबरोबर आमचे घराणे हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असे मुलीचे सासरचे आडनाव घेऊन आत्राम यांनी धमकी दिली आहे. 

एकप्रकारे आत्राम यांनी त्यांची मुलगी शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे कबुल केले आहे. जे माझ्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न रंगवतील त्यांना मी बाजुला करणार. या भूमीवरील गरीब, श्रीमंत सर्वांना न्याय मी दिला आहे. गेली ५० वर्षे मी काम करत आहे. आता हे मध्येच येऊन असे वातावरण तयार करणार असतील तर त्यांची वाट लावायचे काम मी करणार, असा इशारा आत्राम यांनी दिला आहे. याबाबतच वृत्त एबीपी माझाने दिले आहे.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार