शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

“जनतेचे लक्ष विचलित करण्याचा एक स्टंट असू शकतो”; विधानभवन उडवायच्या धमकीवर विरोधकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:26 IST

Raju Shetti News: सरकार अडचणीत येऊ लागले की अशा प्रकारच्या घटना घडवून आणल्या जात असतात, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

Raju Shetti News: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.यातच मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका  ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून, या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विधान भवन परिसराचा ताबा घेतला आहे. केवळ विधानसभा नाही, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय, मेट्रो यांबाबतही धमकीचा मेल आला आहे. यावर विरोधकांनी टीका केली असून, हा एक स्टंट असू शकतो. गंभीर समस्येपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार असू शकतो, असा दावा करत विरोधकांनी टीका केली आहे. 

सरकार अडचणीत येऊ लागले की अशा प्रकारच्या घटना घडवून आणल्या जात असतात. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार नाही आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला कधीच समोर आणले जाणार नाही, असा दावा करत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.

अंधभक्त असलेला एखादा व्यक्ती असू शकतो

या घटनेमागे अंधभक्त असलेला एखादा व्यक्ती असू शकतो. देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असावा, असा दावा राजू शेट्टी यांनी केला. तसेच एपस्टीन फाइलमध्ये देशातील अनेक नेत्यांची नावे समोर आली आहेत. तसेच सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस तुटवडा आणि इतर गंभीर समस्यांकडून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी हा केवळ एक स्टंट असू शकतो. असे शेट्टी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, विधिमंडळाचे कामकाज सुरू असल्याने विधान भवन परिसरात मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी मिळालेल्या या धमकीमुळे विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी हा ईमेल कोठून आला, याचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. ही धमकी केवळ अफवा आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Opposition Criticizes Vidhan Bhavan Bomb Threat as Diversionary Stunt

Web Summary : Opposition calls Vidhan Bhavan bomb threat a diversion from real issues. Raju Shetti alleges a government stunt amid assembly session, demanding thorough investigation. Security tightened.
टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनRaju Shettyराजू शेट्टीMumbai High Courtमुंबई हायकोर्टPoliticsराजकारण