मारहाणीत जखमी झालेल्या पोलिसाची राज ठाकरे यांनी घेतली भेट
By Admin | Updated: August 30, 2016 16:20 IST2016-08-30T16:20:44+5:302016-08-30T16:20:44+5:30
गेल्या आठवड्यात बाईकस्वारांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मारहाणीत जखमी झालेल्या पोलिसाची राज ठाकरे यांनी घेतली भेट
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - गेल्या आठवड्यात बाईकस्वारांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
वांद्रे येथे गेल्या मंगळवारी कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे होते. यावेळी त्यांनी एका अल्पवयीन मुलाला विना हेल्मेट गाडी चालवताना पकडले. सदर मुलाकडे लायसन्स सुद्धा नव्हते. दरम्यान, मुलाची चौकशी सुरु असताना त्या मुलाने आपल्या भावाला बोलावून घेतले. यावेळी त्याच्या भावाने मागून येऊन थेट विलास शिंदे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. या हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले. या घटनेनंतर विलास शिंदे यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, विलास शिंदे यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी यावेळी दिले.