शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 8, 2017 07:30 IST

देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 8 - देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा! अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. 
 
नरेंद्र मोदी सरकारने युनोमध्ये मांडलेली धर्मनिरपेक्षतेची भूमिका शिवसेनेला अजिबात पटलेली नाही. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून आपल्याच सरकारवर जळजळीत टीकास्त्र सोडले आहे. हिंदूंना या जगात स्वतःची म्हणून इंचभर जमीन तरी मिळणार आहे काय? देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यावर जगभरातील हिंदू समाजाने जल्लोष केला, पण आता मोदी सरकारने ‘युनो’त जाऊन जाहीर केले आहे, ‘‘आम्ही निधर्मी आहोत. देश धर्मनिरपेक्ष आहे!’’ हे धक्कादायक आहे. वास्तविक हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी लाखो हिंदू स्वयंसेवकांनी आतापर्यंत बलिदान दिले आहे. देशाचा सत्यानाश ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी शब्दाने केल्याचे खापर आपण नेहमीच नेहरूंच्या टाळक्यावर फोडत राहिलो. या देशात ‘धर्मनिरपेक्ष’ ही शिवी झाली असून समस्त हिंदूंची पीछेहाट व्हावी यासाठीच तुमच्या त्या सेक्युलरवादाचे हत्यार वापरण्यात आले असे अग्रलेखात म्हटले आहे.  
 
पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही येथे जे दोनेक कोटी मुसलमान राहिले त्यांच्या लांगूलचालनासाठी आपण स्वतःला ‘निधर्मी’ म्हणण्यातच धन्यता मानली. त्यांच्या दोन कोटींचे आज बावीस कोटी झाले व ते २२ कोटी धर्माच्या नावावर आपल्याला भारी पडत असतानाही आपण सेक्युलरवादाची बांग देत शेपूट घालणार असू तर हा देश रामाचा, कृष्णाचा आणि सोमनाथाचा उरणार नाही असे उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- ज्यांच्याकडून निधर्मी हिंदुस्थानचे हिंदुराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त हिंदुस्थान निधर्मी असल्याची बांग दिली. हा देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा!
 
 
- हिंदूंना या जगात स्वतःची म्हणून इंचभर जमीन तरी मिळणार आहे काय? देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यावर जगभरातील हिंदू समाजाने जल्लोष केला, पण आता मोदी सरकारने ‘युनो’त जाऊन जाहीर केले आहे, ‘‘आम्ही निधर्मी आहोत. देश धर्मनिरपेक्ष आहे!’’ हे धक्कादायक आहे. वास्तविक हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी लाखो हिंदू स्वयंसेवकांनी आतापर्यंत बलिदान दिले आहे. देशाचा सत्यानाश ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी शब्दाने केल्याचे खापर आपण नेहमीच नेहरूंच्या टाळक्यावर फोडत राहिलो. या देशात ‘धर्मनिरपेक्ष’ ही शिवी झाली असून समस्त हिंदूंची पीछेहाट व्हावी यासाठीच तुमच्या त्या सेक्युलरवादाचे हत्यार वापरण्यात आले. 
 
 
- त्यामुळे दिल्लीत हिंदुत्ववाद्यांचे राज्य आल्याने सेक्युलरवादाचे दफन होईल अशी खात्रीच हिंदूंना होती, पण आपण आता ‘युनो’त जाऊन सांगितले आहे की, ‘‘हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष देश आहे, ज्याचा कोणताही राजकीय धर्म नाही.’’ हिंदुस्थानचे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीच हिंदुस्थान सरकारच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनिव्हा येथील मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात बोलताना हे स्पष्टीकरण दिले. खरे तर हा देश म्हणजे हिंदुराष्ट्रच आहे. पुन्हा देशाचा आत्मा, संस्कार, संस्कृती शुद्ध हिंदुत्वाची आहे हे ठासून सांगायला आज कुणाची भीती आहे? 
 
 
- १९४७ मध्ये धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर उरलेला देश हिंदुस्थान म्हणजे हिंदुराष्ट्रच मानायला हवे, पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही येथे जे दोनेक कोटी मुसलमान राहिले त्यांच्या लांगूलचालनासाठी आपण स्वतःला ‘निधर्मी’ म्हणण्यातच धन्यता मानली. त्यांच्या दोन कोटींचे आज बावीस कोटी झाले व ते २२ कोटी धर्माच्या नावावर आपल्याला भारी पडत असतानाही आपण सेक्युलरवादाची बांग देत शेपूट घालणार असू तर हा देश रामाचा, कृष्णाचा आणि सोमनाथाचा उरणार नाही. हिंदुराष्ट्र म्हणजे इराणच्या खोमेनीचे, अफगाणिस्तानातील तालिबान्यांचे आणि पाक-इराकमधील ‘इसिस’चे राज्य नाही. हिंदुराष्ट्र म्हणजे येथे राहणाऱ्या सर्वांनी आपापल्या श्रद्धांची जपणूक करीत हिंदू संस्कृतीचा स्वीकार करणे. 
 
 
-  हिंदुराष्ट्र याचा अर्थ मुसलमानांसह इतर धर्मीयांनी लुंग्या आणि सूटबूट सोडून पितांबरे नेसावीत, शेंडीजानवे ठेवावे असा नाही तर त्यांनी या मातृभूमीला वंदन करावे, समान नागरी कायदा पाळावा, ‘वंदे मातरम्’चा गजर करावा व धर्मांधतेचे जोखड फेकून द्यावे असा आहे. धर्म तुमच्या घरात ठेवा, मशिदी व चर्चमध्ये राहू द्या, पण बाकी सर्व आपण एकाच हिंदुराष्ट्राचे पाईक आहोत अशी हिंदुराष्ट्राची स्वच्छ संकल्पना मांडून जागतिक व्यासपीठावर सरकारला सांगता आले असते की, ‘‘होय, आम्ही हिंदुराष्ट्र आहोत!’’ त्यात लाज कसली बाळगायची? युरोप खंडातील यच्चयावत राष्ट्रे ‘ख्रिश्चन’ राष्ट्र म्हणून अभिमानाने मिरवतात. अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांचा धर्म ख्रिश्चन आहे.
 
 
-  ५६ देश इस्लामिक रिपब्लिक आहेत. जपान, चीन, श्रीलंका, म्यानमारसारखी राष्ट्रे बौद्ध धर्मास डोक्यावर घेऊन उभी आहेत. पण जगाच्या पाठीवर एकही हिंदुराष्ट्र नसावे याची खंत आणि चीड ज्याच्या अंतरंगात नाही तो हिंदू म्हणून जगण्यास लायक नाही. एकमेव हिंदुराष्ट्र नेपाळही लाल माकडांनी मोडून ते निधर्मी केले व ज्यांच्याकडून निधर्मी हिंदुस्थानचे हिंदुराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त हिंदुस्थान निधर्मी असल्याची बांग दिली. हा विश्वासघातच आहे. भारतीय जनता पक्षाला देशभरात आणि आज खासकरून उत्तर प्रदेशात मिळालेले यश हा फक्त हिंदुत्वाचा डंका आहे. हा देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. राममंदिरासाठी अयोध्येत मरण पत्करणाऱया वीरांचे मोल शून्य ठरेल. राममंदिराची उभारणी हे ढोंग व राजकारण ठरेल आणि गोवंशहत्या वगैरे थोतांड ठरून मतांसाठी हिंदूभक्तांना चेतविण्याचे षड्यंत्र ठरेल. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे काय झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा!