मीटर नसतानाही हजारोंचे बिल

By Admin | Updated: January 19, 2017 05:50 IST2017-01-19T05:50:37+5:302017-01-19T05:50:37+5:30

वारघडपाडा येथील आदिवासी मधुकर बळवंत खोडे यांचा मीटर काढून नेलेले असताना ही त्यांना हजारो रुपयांची वीजबिले पाठविण्यात आली

Thousands of bills in absence of meters | मीटर नसतानाही हजारोंचे बिल

मीटर नसतानाही हजारोंचे बिल


मोखाडा : वारघडपाडा येथील आदिवासी मधुकर बळवंत खोडे यांचा मीटर काढून नेलेले असताना ही त्यांना हजारो रुपयांची वीजबिले पाठविण्यात आली आहेत. पावसाळ्याच्या चार महिन्यांत घर बंद असल्याने मीटरचा वापर होत नव्हता तरीही आपल्याला मोठ्या रकमेचे बिल आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मीटर काढून नेल्यानंतर वीज कोणी वापरली? एवढ्या युनिटचे बील कसे आले? याची चौकशी होऊन मला जबरदस्तीने भरावयास लावलेल्या बिलाची रक्कम मला परत मिळावी, अशी मागणी खोडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of bills in absence of meters