शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

वाकडीच्या दुर्घटने विरोधात ठाणे जिल्ह्यातील बहुजनांसह मागासवर्गीय संघटनांचा मंगळवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:48 PM

विहिरीत पोहल्यामुळे वाकडी येथील चार आरोपींनी मातंग समाजाच्या या अल्पवयीन मुलांनी गावभर नग्न धींड काढली. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींना या मुलांना घरांत कांढून उघड अंगावर पट्याने जबर मारहाण केली.

ठळक मुद्देवाकडीच्या दुर्घटनेविरोधात ठाणे येथे  भारिपच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केंद्र व राज्य सरकार विरूध्द हल्ला बोल मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला तर त्यांचा उद्रेक रोखणे सरकारला जड जाईल, असा इशारा भारिपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण चव्हाण यांनी यावेळी दिला.

ठाणे : जळगांव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील वाकडी येथे दलित समाजातील अल्पवयीन मुलांची नग्न धींड काढून माणुस्कीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या दुर्घनेचे पडसाद आता मुंबईसह ठाणे जिल्ह्यात उमटत आहे. या घटनेतील चारही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जिल्ह्यातील बहुजन समाजातील विविध संघटनांसह मातंग समाजातील संघटना, सर्वच राजकीय पक्षांमध्ये विखुरलेले कार्यकर्ते एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर १९ जून रोजी सकाळी मोर्चा काढणार आहेत.विहिरीत पोहल्यामुळे वाकडी येथील चार आरोपींनी मातंग समाजाच्या या अल्पवयीन मुलांनी गावभर नग्न धींड काढली. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींना या मुलांना घरांत कांढून उघड अंगावर पट्याने जबर मारहाण केली. या काळीमा फासणाऱ्या घटनेसह या आधी देखील राज्यभरात विविध ठिकाणी दलितांवर अन्याय, अत्याचार होत आहे. या घटनांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील बहुजन व दलित समाज एकत्र येऊन केंद्र व राज्य सरकार विरूध्द हल्ला बोल मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असल्याचा निर्णय रविवारी कळवा - विटावा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील क्रांतीसूर्य सभागृहात घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस मासचे अ‍ॅड. राजाभाई सूर्यवंशी, क्रांती सूर्यचे पंढरीनाथ गायकवाड, अण्णा भाऊ जयंती उत्सवचे दिपक आवारे, मातंग पंचायतचे अध्यक्ष विश्वनाथ शिरसाट आदींची उपस्थिती होती.या मोर्चा आधी शनिवारी वाकडीच्या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी खाली कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने येथील शासकीय विश्रामगृहासमोर केली. यामध्ये भारिपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष सुखदेव उबाळे यांच्यासह सुरेश कांबळे, वैभव जानराव, विजया वानखडे, राहुल घोडके, बाळा जाधव, पंढरीनाथ केशव, राजू डिगे, बापूसाहेब माळी, चंद्रकांत कांबळे, अनिल सोनावणे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आरोपींवर जबरी मारहाणीचा गुन्हा आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. जर, अशाच पद्धतीने अत्याचार होऊ लागले तर अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना या सरकारविरोधात बंड पुकारावे लागेल. हा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला तर त्यांचा उद्रेक रोखणे सरकारला जड जाईल, असा इशारा भारिपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण चव्हाण यांनी यावेळी दिला.अनुसूचित जाती-जमातींवर होणा-या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. हे अत्याचार रोखण्यात सरकारला पूर्णत: अपयश आले आहे. जातीय अत्याचार हा सामाजिक प्रश्न आहे. जातीय अत्याचाराचा मुद्दा सामाजिक दृष्ट्या सरकारने सोडविला पाहिजे. त्यासाठी जातीयवादी प्रवृत्तींना जरब बसेल. यासाठी संबधित आरोपींना तत्काळ अटक करु न त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच, जातीभेद निर्मूलनासाठी सामाजिक प्रबोधन कार्यक्र म राबवावेत,आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले................

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी