साडेतेरा हजार अपघाती मृत्यू

By Admin | Updated: January 16, 2016 01:21 IST2016-01-16T01:21:19+5:302016-01-16T01:21:19+5:30

मानवी चुका, रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात रस्ते अपघातांमध्ये २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये ५१९

Thousands of accidental deaths | साडेतेरा हजार अपघाती मृत्यू

साडेतेरा हजार अपघाती मृत्यू

पुणे : मानवी चुका, रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात रस्ते अपघातांमध्ये २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये ५१९ (१.१८ टक्के)ने वाढ झाली आहे. त्यात प्राणांतिक अपघातांची संख्या १३ हजार ५२९ वर गेली असल्याची आकडेवारी पोलीस सूत्रांनी दिली.
२०१३मध्ये राज्यात रस्ते अपघातांच्या ४३ हजार ८६३
घटना घडल्या. या अपघातांत १३ हजार २४५ व्यक्तींना जीव गमवावा लागला.
२०१४ मध्ये अपघातांची संख्या ४४ हजार ३८२, तर मृतांची संख्या १३ हजार ५२९ झाली. राज्यात २०१४ मध्ये सर्वाधिक अपघात नाशिक शहरात (३३६७) घडले आहेत. त्याखालोखाल ठाणे ग्रामीण (२४७४), औरंगाबाद शहर (२३४७), नाशिक ग्रामीण (२३३२) आणि पुणे ग्रामीण (२२८६) यांचा क्रमांक आहे. त्यात नाशिकमध्ये १९४, ठाणे ग्रामीणमध्ये ५१२, औरंगाबाद शहरामध्ये २१०, नाशिक ग्रामीणमध्ये ७८७ व पुणे ग्रामीणमध्ये ९८४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)

दुचाकीस्वारांना सर्वाधिक धोका
१३ हजार ५२९ मृतांपैकी सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत. तब्बल ५ हजार ४६ दुचाकीस्वारांना अपघातांमध्ये प्राण गमवावे लागले असून, हे प्रमाण एकूण अपघातांच्या ३७.३० टक्के एवढे आहे. त्याखालोखाल खासगी ट्रक / लॉरी यांच्यामुळे २ हजार १८४ अपघात झाले आहेत. अनेकदा पादचारी, सायकलस्वार, दुचाकीस्वारांना धडक देऊन पळून गेलेले वाहन निष्पन्न होत नाही. धडक दिलेले वाहन निश्चित न होऊ शकलेल्या अपघाती मृत्यूंची संख्या १ हजार २४० आहे. हे प्रमाण एकूण अपघातांच्या १०.०५ टक्के आहे.

Web Title: Thousands of accidental deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.