शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी एक हजार शिवशाही बस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 11:44 IST

एसटीच्या ताफ्यात सध्या सुमारे एक हजार वातानुकूलित शिवशाही बस आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता एसटी प्रशासनाने आणखी शिवशाही घेण्यास दिली मंजुरी सर्व बस वातानुकुलित आसनी श्रेणीतील ; एप्रिल अखेरपर्यंत ताफ्यात होतील दाखल

पुणे : प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली आणि सततच्या अपघातांमुळे चर्चेत राहिलेल्या शिवशाही बसचा ताफा आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच आणखी एक हजार शिवशाही बस येणार आहेत. त्यातील सुमारे ६०० बस एसटीकडून विकत घेतल्या जाणार आहेत.एसटीच्या ताफ्यात सध्या सुमारे एक हजार वातानुकूलित शिवशाही बस आहेत. त्यापैकी ५०० बस एसटीच्या मालकीच्या आहेत. तर उर्वरीत बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही बस शयनयान सुविधा असलेल्या आहेत. शिवशाही व्यतिरिक्त वातानुकूलित शिवनेरी, हिरकणी निमआराम, यशवंती मिडी, शितल निमआराम, वातानुकूलित अश्वमेध आणि साधी अशा विविध प्रकारच्या बस आहेत. जुलै २०१७ मध्ये शिवशाही बस दाखल झाल्या. तेव्हापासून या बसला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ही बस सततच्या अपघातांमुळे सर्वाधिक प्रकाशझोतात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलै २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत शिवशाहीचे २४० अपघात झाले. त्यामध्ये ८४ बस भाडेतत्वावरील होत्या. एकुण अपघातांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला तर २९१ प्रवासी जखमी झाले आहे. त्यानंतर एसटी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता एसटी प्रशासनाने आणखी शिवशाही घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसटीकडून खरेदी केल्या जाणाऱ्या सुमारे ६०० बसची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. या बस एप्रिल अखेरपर्यंत ताफ्यात दाखल होतील. तर भाडेतत्वावरील ४०० बसची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याही बस लवकरच मिळतील. या सर्व बस वातानुकुलित आसनी श्रेणीतील असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.----------सध्या शिवशाही बस - मालकीच्या - ५००भाडेतत्वावरील - ५००------------नियोजित शिवशाही बस -मालकीच्या - ६००भाडेतत्वावरील - ४००

टॅग्स :PuneपुणेShivshahiशिवशाहीDiwakar Raoteदिवाकर रावते