शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात हजार मालवाहतूक ट्रक धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:25 IST

नव्या वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाचे माल वाहतूक करणारे एक हजार ट्रक रस्त्यावर धावण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

मुंबई : नव्या वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाचे माल वाहतूक करणारे एक हजार ट्रक रस्त्यावर धावण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. त्या संदर्भातील अहवाल या वर्षी सल्लागार कंपनीकडून मांडण्याची खात्रीलायक माहितीही संबंधित अधिकाºयाने दिली. यावर गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पासाठी प्रयत्न करत असून, यंदा तो मूर्त स्वरूपात साकार करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.रेल्वेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे रस्ते माल वाहतुकीस सुरुवात करण्याची संकल्पना रावते यांनी मांडली. त्यानुसार, सल्लागार कंपनीकडून या संदर्भात अभ्यास सुरू आहे. तो अहवाल सादर झाल्यानंतरच अधिक माहिती देण्यात येईल, असेही रावते यांनी सांगितले. या वर्षी संबंधित अहवाल महामंडळ स्तरावर सादर होण्याची माहिती एका वरिष्ठाने दिली, तसेच महामंडळाच्या संमतीनंतर तत्काळ संबंधित अहवालाला शासन मंजुरी मिळण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांनीही या संकल्पनेबाबत सकारात्मक पवित्रा घेतल्याचे संबंधित अधिकाºयाने सांगितले.दरवर्षी महामंडळातून एक ते दीड हजार एसटी भंगारात जातात. याच भंगारातून संबंधित ट्रकची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. ज्या एसटीचे इंजिन चांगल्या क्षमतेत आहे, त्यांचा वापर पुढील चार ते पाच वर्षांसाठी माल वाहतुकीसाठी करण्याचाही विचार आहे. एकंदरीतच पहिल्या टप्प्यात एक हजार ट्रक तयार करण्याचे विचाराधीन आहे.या मालवाहतुकीमध्ये कृषी माल शहरी भागात पोहोचवण्यासाठी प्राधान्य देण्याचा महामंडळाचा विचार आहे. अर्थात, बाजारातील इतर माल वाहतूक स्पर्धकांच्या तुलनेत किफायतशीर दरामध्ये ही वाहतूक पुरविली जाईल. मात्र, प्रवासी वाहतुकीप्रमाणे सेवा पुरविण्याचा उद्देश न ठेवता, आर्थिक नफ्याचा उद्देशही समोर ठेवला जाईल. जेणेकरून रेल्वे प्रशासनाप्रमाणेच माल वाहतुकीमधील नफा प्रवासी सेवेतील तूट भरून काढण्याचे काम करेल. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.नवीन भरती करणार!प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत माल वाहतुकीमधील नियमांत बरीच तफावत आहे. त्यामुळे माल वाहतुकीसाठी सुमारे एक हजार चालकांची स्वतंत्र भरती करण्यात येणार आहे.पार्किंगचे नो टेन्शन!सध्या एसटी महामंडळाकडे असलेल्या जागेमध्ये १९ हजार गाड्या उभ्या केल्या जातात. सुमारे २५ हजार गाड्या सामावून घेण्याइतकी जागा महामंडळाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे नवे एक हजार ट्रक ताफ्यात सामील झाल्यानंतर, त्यांच्या पार्किंगचा प्रश्न उद्भवणार नसल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ