राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव जरी आला तरी तो माणूस होतो - एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 10:51 AM2017-11-23T10:51:31+5:302017-11-23T10:54:37+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात  एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

Though there was a donkey in the RSS, he became a man - Eknath Khadse | राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव जरी आला तरी तो माणूस होतो - एकनाथ खडसे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव जरी आला तरी तो माणूस होतो - एकनाथ खडसे

googlenewsNext

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले आहेत. संघाच्या शिस्त आणि यंत्रणेत एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो, असे ते म्हणाले.  भुसावळमध्ये बुधवारी संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात खडसे बोलत होते.

भाजपच्या स्थापनेत संघाचे मोठे योगदान असल्याचे असेही त्यांनी सांगितले. राज्यासह देशभरात ज्या ज्या ठिकाणी संघाच्या शाखा आहेत. अशा ठिकाणी भाजपाची वाढ झाल्याचा दावाही खडसेंनी केला. शिवाय, भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगवरुन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. या सोहळ्याला एकनाथ खडसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मंडळी उपस्थित होती. 

“संघाच्या शिस्तीत वाढलेले बापूराव मांडे यांच्या कार्याने आणि शिस्तीने मी प्रभावित झालो. अडचणीच्या काळात मांडे यांनीच मला मार्गदर्शन केले, असे त्यांनी आवर्जून सांगितले. बापू मांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यात शाखांचा विस्तार केला. त्यांनी सुरु केलेल्या शाखांचा फायदा भाजपलाच झाला असे त्यांनी सांगितले. नेता घडल्याने पक्ष वाढतो, त्यामुळे माझ्यामुळे पक्ष वाढला ही धारणाच चुकीची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक अडचणींच्या काळात त्यांनी आपल्याला केलेले मार्गदर्शन हे आपल्या जीवनात अतिशय मोलाचे ठरले आहे.” असे खडसे यांनी म्हटले.

Web Title: Though there was a donkey in the RSS, he became a man - Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.