शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

'त्या' तरूणांना शरद पवारांची साथ, म्हणाले....मी तुमच्या पाठीशी आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 08:49 IST

सोशल मीडियावर लिहिणारे ७०च्या आसपास तरुण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येऊन आज मला भेटले. ते कुठल्या राजकीय विचारांचे किंवा पक्षाचे दिसत नाहीत.

मुंबई - काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये सरकारच्या विरोधी लिहीलं म्हणून अनेक तरूणांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्या तरूणांनी काल मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहू, असे आश्वासन शरद पवारांनी यावेळी तरूणांना दिले. एखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय पाठवू शकतात, असा सवालही त्यांनी फडणवीस सरकारला केला आहे. याबाबत शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली.  काय आहे शरद पवारांची पोस्ट -सोशल मीडियावर लिहिणारे ७०च्या आसपास तरुण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येऊन आज मला भेटले. ते कुठल्या राजकीय विचारांचे किंवा पक्षाचे दिसत नाहीत. पण लोकशाहीचा मूलभूत अधिकार आणि सेक्युलरिझम या दोन गोष्टींसंबंधी त्यांची भूमिका आग्रही दिसते. कुठे विसंगती दिसल्यास फेसबुकवर लिहून आपली मतं ते व्यक्त करतात. परंतु त्यांना धमकावण्याचा प्रकार त्यांच्या भागामध्ये स्थानिक पोलिसांकडून होतो आहे. त्यांच्या पाठीशी कुणी उभं राहण्याची गरज आहे. पक्षीय दृष्टिकोनातून नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या संबंधी भूमिका घणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहे त्यांच्याविरोधात आम्ही मजबुतीने या तरुणांच्या पाठीशी उभं राहण्याचे आश्वासन या बैठकीत दिले दिले. एवढंच नाही या तरुणांच्या विरोधात नोटिसा आणि खटले भरण्याचं काम सुरू आहे त्यासंबंधी काही कायदेशीर सल्लागारांना बोलावून घेऊन सहाय्य करण्यासाठी एक विभाग आम्ही सुरू करत आहोत. या माध्यमातून या तरुणांना दिलासा देण्यासाठी आजची बैठक होती.आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. असे असताना सध्याची शासकीय व्यवस्था, निर्णय या विरोधात व्यक्त होणाऱ्या तरूणांना अधिकाराचा गैरवापर करत दमदाटी करण्याचे प्रकार घडत आहे. तरूणींना गलिच्छ भाषेत धमकावलं जाते आहे. एका तरूणाला तर काही दिवस तुरूंगातसुद्धा डांबण्यात आले. हा कसला कायदा? सायबर सेलच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांनी तरूणांवर केलेल्या कारवाईचा मी निषेध करतो. या अधिकाऱ्यांना राज्यसरकारकडून कोणत्या सूचना केल्या गेल्या त्याच्या खोलात जाणे गरजेचे आहे. मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील ओएसडी अधिकाऱ्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन दिले जात असल्याचे दिसतेय. या अधिकाऱ्याची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात होण्यापूर्वी, एका राजकीय पक्षाशी त्या संलग्न होत्या. तेव्हा माझ्या आणि माझ्या काही सहकाऱ्यांच्या विरोधात गलिच्छ पोस्ट लिहिल्या गेल्या. याबाबत माझी काहीच तक्रार नाही. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्तीनंतर त्या सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे राजकीय पोस्ट टाकण्याचा त्यांना अधिकार नाही. हा प्रशासकीय शिस्तीचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा नोंद घ्यावी. सुसंस्कृत लौकिक असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयातील असंस्कृत वागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घ्यायला हवी ही आमच्या पाक्षाची मागणी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मूलभूत अधिकाराची गळचेपी करणाऱ्या या प्रवृत्ती विरोधात आम्ही कायम उभे राहू.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSocial Mediaसोशल मीडियाHate Commentहेट कमेंटMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस