ज्यांना सेनेत यायचे आहे, त्यांनी लवकर यावे - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: July 13, 2014 18:02 IST2014-07-13T15:43:34+5:302014-07-13T18:02:44+5:30
ज्यांना शिवसेनेत यायचे आहे,त्यांनी जरूर यावे, पण लवकरात लवकर असा सूचक इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला आहे

ज्यांना सेनेत यायचे आहे, त्यांनी लवकर यावे - उद्धव ठाकरे
ऑनलाइन टीम
इस्लामपूर, दि. १३ - ज्यांना शिवसेनेत यायचे आहे, त्यांनी जरूर यावे, पण लवकरात लवकर असा सूचक इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. इस्लापूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मात्र आपण व्यक्तीचा पूर्व इतिहास पाहूनच पक्षात घेऊ, असेही त्यांनी यावेळी ठणकावले.
नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली, त्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे यांनी हे सूचक विधान केले. दरम्यान, केसरकरांशिवाय शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले, राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं वृत्त एका वृत्तपत्राने छापले होते.
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळं आता पुन्हा नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.