‘हायजॅक’ची धमकी देणाऱ्यास अटक
By Admin | Updated: November 29, 2015 01:21 IST2015-11-29T01:21:58+5:302015-11-29T01:21:58+5:30
एअर इंडियाचे विमान २८ नोव्हेंबर रोजी ‘हायजॅक’ करण्याची धमकी देणाऱ्या मध्य प्रदेश, रहटगावमधील महेश विष्णुप्रसाद मीणा (२०) याला ठाणे शहर पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी अटक

‘हायजॅक’ची धमकी देणाऱ्यास अटक
ठाणे : एअर इंडियाचे विमान २८ नोव्हेंबर रोजी ‘हायजॅक’ करण्याची धमकी देणाऱ्या मध्य प्रदेश, रहटगावमधील महेश विष्णुप्रसाद मीणा (२०) याला ठाणे शहर पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याने हा कॉल मिळालेल्या सीमकार्डवरून केल्याचे समोर आले आहे. सध्यातरी तो बोगस कॉल आहे, असे म्हणता येणार नाही. तसेच त्याने आपण इसिस या अतिरेकी संघटनेचा सदस्य असल्याची बतावणी केल्याप्रकरणी मुंबई दहशतवादविरोधी पथक आणि गुप्तचार खाते त्याची चौकशी करीत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली.
‘मैं इसिस का आतंकवादी बात कर रहा हूँ, हम २८ नव्हंबर को एअर इंडिया का प्लेन हायजॅक करनेवाले है, अशी धमकी वागळे इस्टेट रोड नंबर २२ येथील एअर इंडियाच्या कॉल सेंटरला २० नोव्हेंबर रोजी फोन करून दिली. याप्रकरणी संबंधित कॉल सेंटर व्यवस्थापनाने श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकानेही तपास सुरू केला. याचदरम्यान, तो कॉल मध्य प्रदेशातून आल्याचे तपासात उघडकीस आल्यावर श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.जी. तुंगेनवार, हवालदार भगवान मोरे आणि विकास लाहोर असे पोलीस पथक मध्य प्रदेशला रवाना झाले.
याचदरम्यान, या पथकाने स्थानिक चिंचाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कुमरे आणि रहटगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रघुवंशी यांच्या मदतीने मीणा याला अटक केली. त्याला घेऊन ठाणे पोलीस २७ नोव्हेंबर रोजी ठाण्यात आल्यावर चौकशी करून अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी भादंवि कलम ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील रहटगावातून महेश वाणीला अटक
१) महेश मीणा हा १२ वी आर्टस्चा विद्यार्थी आहे.
तो मध्य प्रदेशातील रहटगाव येथे आई, वडील, भाऊ आणि बहिणीसह राहतो. त्याचे पहिलीपासूनचे शिक्षण तेथील पूर्वप्राथमिक आणि माध्यमिक शाळेत झाले, तसेच त्याचे वडील शेतकरी
असून, त्यांची सव्वा एकर शेती आहे, तर त्याचा भाऊ नोकरी करतो.
२) रहटगाव हे मध्य प्रदेशमधील हर्धाच्या सीमेवर आहे. येथील
लोकसंख्या साधारणत: १० ते १५ हजार असून, २५ टक्के लोकवस्ती
ही मुस्लीम आहे.
३) महेशकडे मिळालेल्या तीन सिमकार्डमध्ये एक सिमकार्ड त्याच्या तर दुसरे त्याच्या भावाच्या नावे आहे. तिसरे सीम हे त्याला मिळाले आहे, असे प्राथमिक तपासात समोर आले. ते सीम चोरीचे किंवा गहाळ झालेल्या मोबाइलमधील असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
४) ज्या सीम नंबरवरून फोन आला होता, ते महेशचे नसून, ते सिम मध्य प्रदेशातील अन्य एकाचे आहे. त्यातील बॅलन्स ५२ रुपये असल्याने, मूळ सिमधारकाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि या प्रकरणी कोणतीच तक्रार त्याने केली नसल्याचे, सध्या तरी समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विमान हायजॅक करण्याची धमकी देणाऱ्यास अटक के ली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, तो कॉल बोगस आहे का? त्याचबरोबर त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा अतिरेकी संघटनेशी काही संबंध आहे का?, याबाबत श्रीनगर पोलीस, मुंबई दहशतवादी पथक आणि गुप्तचर खात्यामार्फत चौकश्ी सुरू असल्याचे, वागळे इस्टेट परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी सांगितले.