ज्यांना शेतीतलं कळत नाही त्यांनी मला शिकवू नये - एकनाथ खडसे

By Admin | Updated: November 25, 2014 15:13 IST2014-11-25T11:24:39+5:302014-11-25T15:13:35+5:30

वस्तुस्थिती जाणून घेतली तर उद्धव ठाकरे माझी तुलना अजित पवारांशी करणार नाहीत असंही खडसे म्हणाले.

Those who do not understand the farming should not teach me - Eknath Khadse | ज्यांना शेतीतलं कळत नाही त्यांनी मला शिकवू नये - एकनाथ खडसे

ज्यांना शेतीतलं कळत नाही त्यांनी मला शिकवू नये - एकनाथ खडसे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ - ज्यांना शेतीतलं काही कळतं नाही, भुईमूग जमिनीच्या खाली की वर उगवतो हेही माहीत नाही अशा लोकांनी माझ्यासारख्या शेतक-याच्या मुलाला शेती शिकवू नये असा टोमणा एकनाथ खडसे यांनी मारला आहे. हे त्यांचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांना उद्देशून असल्याचे प्रसारमाध्यमात पसरले. मात्र, नंतर खडसे यांनी आपण हे एका वाहिनीच्या प्रतिनिधीला ज्याने आपल्या शेतकरीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्याला उद्देशून म्हटल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहित नसून त्यांनी ती जाणून घेतली तर ते माझी तुलना अजित पवारांशी करणार नाहीत अशी सारवा सारवही त्यांनी केली आहे.
शेतक-यांची क्रूर चेष्टा करणारे एकनाथ खडसे आणि अजित पवार एकच असा टोला उद्धव यांनी खडसेंना लगावला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना खडसेंनी उद्धव यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मी शेतक-यांच्या वीज बिलासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले. माझे वाक्य अर्धवटच दाखवण्यात आले. शेतक-यांना वीज बील भरण्यास सांगत असतानाच सवलत देण्याबद्दल आपण बोललो होतो असेही ते म्हणाले. माझे वक्तव्य हे शेतक-यांच्या हितासाठीच होते. मात्र उद्धव यांनी माझं पूर्ण बोलणं ऐकलं नाही. फक्त टीव्हीवर दाखवण्यात आलेले वक्तव्य ऐकून प्रतिक्रिया दिली. माझी कोणाशी तुलना करावी हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी शेतक-याचा मुलगा आहे. अनेक वर्ष मी शेतात घाम गाळला आहे. आजही माझे घर शेतातच आहे, असे सांगत लोकांनी मला शेतीविषयी शिकवू नये, असे ते म्हणाले. 
दरम्यान सरकारतर्फे टंचाईग्रस्त भागातील शेतक-यांच्या वीज बिलात ३३ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे, असे खडसे यांनी जाहीर केले. तसेच दहावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्कही माफ करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
शेतक-यांनी सगळंच वीजबिल फुकट मागू नये, किमान ५० टक्के वीजबिल भरावे असे आवाहन आपण सतत करणार असून त्यात गैर असे काहीही नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Web Title: Those who do not understand the farming should not teach me - Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.