पुणे : पीक विमा कंपन्यांच्या कार्यलयांवर शेतकऱ्यांना फसवल्याप्रकरणी राज्यभर मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फटकारले आहे. संबंधितांनी बोलवून काम करून घेण्याऐवजी सत्तेत राहणारे मोर्चा काढत आहेत. हे त्यांचे काम नाही अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेवर टीका केली.पुण्यात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संपन्न गुरुजन गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लेखक डॉ.अनिल अवचट आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर, कॉम्रेड मुक्ता मनोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.ते यावेळी म्हणाले की, अधिवेशनाच्या काळात दुष्काळाच्या चर्चेच्या दरम्यान पीक विम्याच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींची भाषणे बघितली तर ती आमची मागणी होती हे लक्षात येईल. पीकविमा काढताना फक्त विमा कंपन्यांचा फायदा मिळतो. शेतकऱ्याला काहीही मिळत नाही. सध्या शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. ते सरकारमध्ये आहात, राज्यात आणि केंद्रात त्यांचे मंत्री आहेत. सरकार चालवणाऱ्यांनी मोर्चा न काढता संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून, सूचना देऊन कार्यवाही करायची असते. सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो, हे त्यांचं काम नाही. शिवसेना कुठेतरी कमी पडत आहेत. त्यांना प्रशासनावर वकुब ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत हे दाखवण्याचा शिवसेना केविलवाणा प्रयत्न आहे.
सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो ; अजित पवार यांचा शिवसेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 13:14 IST
सध्या शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची आहे. ते सरकारमध्ये असून त्यांचे राज्यात आणि केंद्रात मंत्री आहेत...
सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो ; अजित पवार यांचा शिवसेनेला टोला
ठळक मुद्देपुण्यात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संपन्न गुरुजन गौरव सोहळा