‘त्या’ चित्रपटांना शुल्क माफ

By Admin | Updated: August 25, 2014 03:17 IST2014-08-25T03:17:24+5:302014-08-25T03:17:24+5:30

एशियन फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रपट महोत्सवातील चित्रपटांना करमणूक शुल्क माफ करण्यात आल्याचा शासननिर्णय जारी केला आहे.

For those 'movies' waived the fee | ‘त्या’ चित्रपटांना शुल्क माफ

‘त्या’ चित्रपटांना शुल्क माफ

मुंबई : एशियन फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रपट महोत्सवातील चित्रपटांना करमणूक शुल्क माफ करण्यात आल्याचा शासननिर्णय जारी केला आहे.
एशियन फिल्म फाउंडेशनच्या चित्रपट महोत्सवादरम्यान चित्रपटांचे खेळ चित्रपटगृहामध्ये आयोजित केल्यानंतर या खेळांसाठी करमणूक शुल्क माफ केले आहे. यासाठी काही अटी आणि शर्तींचे पालन करावे लागणार आहे. या चित्रपट महोत्सवासाठी नोंदणी शुल्क ऐच्छिक ठेवावे. तसेच आयोजकांना आणि चित्रपटगृह मालकांना चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात प्रेक्षकांसाठी ठळक अक्षरात माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. करमणूक शुल्कातील ही सवलत केवळ वर्षातून एकदाच चित्रपट महोत्सवाच्या जास्तीत जास्त सात दिवसांसाठी लागू राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: For those 'movies' waived the fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.