शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी; मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट

By यदू जोशी | Updated: March 1, 2025 08:59 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या  योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता.

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांमधील कामांचा अनुभव तरुण-तरुणींना मिळावा व त्यातून ते रोजगारक्षम व्हावेत म्हणून त्यांना सहा महिन्यांसाठी विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राज्य सरकारने सुरू केली खरी; पण आता ती सरकारच्या अंगलट आली आहे. ज्यांना सरकारी कार्यालयांमध्ये सहा महिने काम मिळाले ते आता नोकरीत कायम करा, अशी मागणी करू लागले आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली. ॲप्रेंटसशिप आणि मासिक १० हजार रुपये विद्यावेतन, अशी याचे स्वरूप आहे. खासगी क्षेत्रातील कामाचा अनुभव देण्याचा योजनेमागचा मुख्य उद्देश होता; पण सरकारी कार्यालयांमध्येच काम मिळावे यासाठी बहुतेकांचा कल होता. ही योजना कौशल्य विकास विभागामार्फत राबविली जाते. सहा महिने प्रशिक्षण घेतलेले हजारो तरुण आता संघटन बांधून सरकारवर नोकरीसाठी दबाव आणत आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या  योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता. मात्र, आता काही आमदारच सहा महिने काम केलेल्यांना कायम करा, अशी मागणी करू लागले आहेत. आंदोलनाची भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे योजना सुरू ठेवायची की नाही याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे, असे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले.

१.१८ लाख युवांना मिळाली संधीमुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत १ लाख २३ हजार युवक-युवतींना प्रत्येकी सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना ३४१ कोटी रुपयांचे विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले.  सरकारी कार्यालयांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्यांची संख्या ७८,४३२ तर खासगी क्षेत्रातील संख्या ४०,२२५ आहे. 

योजनेचा कालावधी ११ महिन्यांचा करणार?  सरकारी नोकरीची एक प्रक्रिया असते, ती पूर्ण न करता कोणी नोकरीत कायम करा यासाठी दबाव आणत असेल तर त्याच्यापुढे झुकण्याचे कारण नाही, अशी भावना मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यावर सर्व मंत्र्यांचे एकमत होते; पण ही योजना ११ महिन्यांसाठी करावी, असा आग्रह काही मंत्र्यांनी बैठकीत धरला. तो मान्य केला जाण्याची शक्यता आहे. योजनेला सहा महिने मुदतवाढ द्यावी आणि नंतर ती बंद करावी, असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर योजनेबाबत सरकार ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालयgovernment jobs updateसरकारी नोकरी