१५ शिक्षकांची कसून चौकशी
By Admin | Updated: September 8, 2015 00:48 IST2015-09-08T00:48:30+5:302015-09-08T00:48:30+5:30
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेतील हाणामारीप्रकरणी १५ शिक्षकांची कसून चौकशी करण्यात आली. संपूर्ण अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

१५ शिक्षकांची कसून चौकशी
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेतील हाणामारीप्रकरणी १५ शिक्षकांची कसून चौकशी करण्यात आली. संपूर्ण अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
शिक्षक बँकेची ७६वी वार्षिक सर्वसाधारण सभा २३ आॅगस्टला आयोजित केली होती. या सभेत सत्तारूढ व विरोधक यांच्यात धुमश्चक्री झाली होती. विविध प्रसारमाध्यमांकडील यासंबंधीचे फूटेज, छायाचित्रांच्या आधारे १५ शिक्षकांचा शिक्षण विभागाच्या त्रिसदस्य समितीने शोध घेतला आहे. यात सहभागी इतर गुरुजींचा शोध सुरू आहे. या शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव चार दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
या हाणामारीची चौकशी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर दोषींविरुद्ध कारवाईसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला जाईल.
- सुभाष चौगुुले,
प्राथमिक शिक्षणाधिकारी