ंपोटॅशचा अत्यल्प पुरवठा

By Admin | Updated: May 11, 2014 00:31 IST2014-05-11T00:31:33+5:302014-05-11T00:31:33+5:30

शेतकर्‍यांसाठी अति महत्त्वाचे मानले जाणारे डीएपी (डाय अमोनिअम फॉस्फेट) चा शून्य टक्के पुरवठा झाला आहे.

Thompsy's minimal supply | ंपोटॅशचा अत्यल्प पुरवठा

ंपोटॅशचा अत्यल्प पुरवठा

 जळगाव : जिल्हाभरातील शेतकर्‍यांसाठी कृषक वापरासाठी या खरीप हंगामाच्या अखेरपर्यंत दोन लाख ३५ हजार ९०० मे.टन विविध खते देण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. परंतु यात शेतकर्‍यांसाठी अति महत्त्वाचे मानले जाणारे डीएपी (डाय अमोनिअम फॉस्फेट) चा शून्य टक्के पुरवठा झाला आहे. पोटॅश व १०-२६-२६ चा पुरवठादेखील अत्यल्प आहे. कृषी विभागाने तीन लाख मे.टन खत जिल्हाभरासाठी मिळावे, अशी मागणी कृषी आयुक्तालयाकडे केली होती. परंतु ती मान्य झाली नाही. हंगामाच्या अखेरपर्यंत दोन लाख ३५ हजार ९०० मे.टन खतपुरवठा होईल. त्यात १ लाख १९ हजार ३०० मे.टन युरीया, ४३ हजार मे.टन फॉस्फेट, २४ हजार ९०० मे.टन पोटॅश, ४२०० मे.टन डीएपी, ४२ मे.टन अमोनिअम सल्फेट, ५४ मे.टन २०-२०-०, ९०० मे.टन १९-१९-१९, ४१०० मे.टन २४-२४-०, १४०० मे.टन १४-३५-१४, ६७०० मे.टन १५-१५-१५, ३३०० मे.टन १२-३२-१६, १६६०० मे.टन १०-२६-२६, १३०० मे.टन १६-१६-१६ व इतर खते मिळतील, असे म्हटले आहे. दावा मोठा केलेला असला तरी अद्याप फक्त १०५ मे.टन पोटॅशचा पुरवठा झाला आहे. तर डीएपी या खताचा पुरवठाच झालेला नाही. याचा अर्थ या खतांचा तुटवडा निर्माण करण्याचे प्रयत्न आतापासून सुरू झाले आहेत. खतपुरवठ्याच्या टक्केवारीत पोटॅशचा १६ टक्केच पुरवठा झाला आहे. तर १०-२६-२६ या खताचा फक्त एक टक्के म्हणजेच २३ मे.टन पुरवठा झाला आहे. परंतु मागील हंगामाचा म्हणजे रब्बी हंगामात जिल्ह्यास प्राप्त झालेल्या खतांमधून मिश्र व सरळ खतांचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. यामुळे तुटवडा वगैरे नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. लिकींगचे फंडे युरीयाचा पुरवठा मुबलक प्रमाणात झालेला असला तरी विक्रेते पाचपेक्षा अधिक युरीयाच्या गोण्या शेतकर्‍यांना देण्यास नकार देतात. मोठ्या शेतकर्‍यांसाठी युरीया राखून ठेवला जातो. छोट्या शेतकर्‍यांना युरीयाची गरजही कमी असते, पण त्यांच्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात आहेत. कृत्रीम तुटवडा, लिकींग आणि साठेबाजीचे लोण जिल्हाभरात पसरू लागल्याची माहिती आहे.

Web Title: Thompsy's minimal supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.