शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

घुमणारी समुद्री गाज आणि दोन खळाळत्या तरुण नद्यांचा सन्मान; यंदा देशात सहा ठिकाणी रंगणार सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:11 IST

२२ मार्चला नागपुरातून प्रारंभ : लिजंड, आयकॉन पुरस्कारांनी दिग्गजांचा गौरव...

नागपूर : एकीकडे थेट 'पांढरी चार'चा उंचावरचा स्वर लीलया लावणारा, ग्वाल्हेर घराण्याची लखलखती शागीर्दी तरुण खांद्यांवर आत्मविश्वासाने पेलणारा अनिरुद्ध ऐथल आणि दुसरीकडे इन्फ्ल्यूएंसर्सच्या दुनियेत धूम मचवून   असणाऱ्या अंतरा व अंकिता या  नंदी भगिनी... एकीकडे घराणेदार भारतीय शास्त्रीय संगीताचा आदबशीर खानदानी वारसा आणि दुसरीकडे शास्त्रीय संगीत शिक्षणाच्या भरजरी वस्त्राला पॉप-कल्चरची लहरेदार झूल लावण्याचे धमाकेदार कसब... अगदी वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या सांगीतिक प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन उमलत्या तरुण संगीत प्रतिभांचा सन्मान या वर्षी होतो आहे 'सूरज्योत्स्ना'च्या मंचावर!

 ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त ‘लोकमत समूहा’च्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘सूरज्याेत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याचा यंदा, बाराव्या वर्षी देशभर विस्तार करण्यात आला असून, नागपूर, मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू व यवतमाळ अशा सहा ठिकाणी पुरस्कार वितरण होणार आहे. २२ मार्च ते २५ एप्रिल अशा महिनाभरापेक्षा अधिक काळ चालणाऱ्या या बहारदार मैफलीची सुरूवात नागपुरातून होईल. 

संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांचा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात केला जातो. बंगळुरूचा तरुण प्रतिभावान हिंदुस्थानी शास्त्रीय गायक अनिरुद्ध ऐथल आणि गाण्याच्या सादरीकरणातून सोशल मीडियात धमाल उडविणाऱ्या कोलकात्याच्या अंतरा व अंकिता नंदी  ‘सूरज्याेत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२५’ चे विजेत्या आहेत.

यंदाच्या या पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे यवतमाळ वगळता अन्य पाच सोहळ्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘लिजंड’ व ‘आयकाॅन’ पुरस्काराने ख्यातनाम कलावंतांना गौरविले जाणार आहे. नागपुरातील सुरेश भट सभागृहात होणाऱ्या पहिल्या समारंभात ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर यांना  ‘लिजंड’   तर सुप्रसिद्ध गझल गायक तलत अझीझ यांना ‘आयकाॅन’ पुरस्काराने गौरविण्यात येईल. प्रख्यात सतार वादक शुजात हुसेन खान यांचे सुफी गायन हे या सोहळ्याचे खास आकर्षण आहे. 

सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार मालिका नागपूर : २२ मार्च सुरेश भट सभागृह, नागपूर यवतमाळ : २३ मार्च : शक्तिस्थळ, यवतमाळ (दोन्ही ठिकाणी संगीतकार, प्रख्यात सतार वादक शुजात खान).   ‘लिजंड’   - गायिका उषा मंगेशकर, आयकॉन - गझलगायक तलत अझीझमुंबई : २८ मार्च एनसीपीए (टाटा थिएटर) मुंबई (सुफी जाझ प्रस्तुत लुईस बॅंक्स, पूजा गायतोंडे, जीनो बॅंक्स, सेल्डन डिसिल्व्हा, हर्ष भावसार, जयंती गोसेर, उन्मेश बॅनर्जी).  ‘लिजंड’   - गीतकार जावेद अख्तर, आयकॉन - गायक नितीन मुकेशपुणे : २९ मार्च महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे (सूरज्योत्स्ना बँड, सादरीकरण आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, हरगुन कौर, मेहताब अली, एस. आकाश, रमाकांत गायकवाड, शिखर नाद कुरेशी).  ‘लिजंड’   - गायक पं. उल्हास कशाळकर, आयकॉन - तबलावादक विजय घाटे नवी दिल्ली : १२ एप्रिल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ऑडिटोरिअम, नवी दिल्ली (प्रसिद्ध पार्श्वगायक मामे खान, राजस्थान).  आयकॉन - गायिका अनिता सिंघवीबंगळुरू : २५ एप्रिल प्रेस्टिज सेंटर परफार्मिंग आर्ट, बंगळुरू (सूरज्योत्स्ना बँड).  ‘लिजंड’   - गायिका कविता कृष्णमूर्ती, आयकॉन - संगीतकार रिकी केज

टॅग्स :sur Jyotsna awardसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारLokmat Eventलोकमत इव्हेंट