शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत पहिल्यांदा होणार मैदानी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:43 IST

मैदानी चाचणी पहिल्यांदा घेण्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना  भरतीसाठी अधिक संधी  मिळणार आहे.

जमीर काझी -अलिबाग : पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीमध्ये आता पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून नवीन नियमावली लागू करण्याबाबत राजपत्र जारी करण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत राज्यातील विविध पोलीस घटकांत ७ हजार कॉन्स्टेबलची पदे भरण्यात येणार आहेत. मैदानी चाचणी पहिल्यांदा घेण्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना  भरतीसाठी अधिक संधी  मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा  व त्यानंतर पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेऊन अंतिम गुणवत्तायादी निवड यादी जाहीर करण्याचे निर्णय घेण्यात आला होता. भरतीसाठी होणारी गर्दी व  गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र,  बदललेल्या नियमांमुळे  ग्रामीण भागातील युवकांना तुलनेत कमी संधी निर्माण झाली होती. त्यामुळे २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी  शिवसेनेने  आपल्या जाहीरनाम्यात  पोलीस भरतीत ही पद्धत रद्द करून पूर्ववत मैदानी चाचणी प्रथम व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्याचे नमूद केले होते. २०१९ मध्ये जाहीर केलेल्या रिक्त  ५,२९७ पदासाठीची भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली होती  जाहिरातीमध्ये तसे नमूद केल्याने ते बदलले नव्हते. मात्र, यावर्षीच्या भरतीसाठी सेवा प्रवेश प्रकियेत सरकारने दुरुस्ती  केली  आहे.  उमेदवाराची पहिल्यांदा मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.   अशी होणार  मैदानी चाचणी -शैक्षणिक व शारीरिक अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची  ५० गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये पुरुषांसाठी १६ मीटर धावणेसाठी २० गुण व १०० मीटर धावणे आणि गोळाफेकसाठी प्रत्येकी पंधरा गुण दिले जातील, तर महिला उमेदवारासाठी १६०० ऐवजी ८०० मीटर धावण्याची चाचणी असेल.

ग्रामीण भागातील तरुणांची मागणी लक्षात घेऊन पोलीस भरतीच्या सेवा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने त्यांचा उमेदवारांना अधिक लाभ होईल. - सतेज पाटील, गृह राज्यमंत्री

टॅग्स :PoliceपोलिसStudentविद्यार्थी