शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"…हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नव्हे तर डिपोर्ट कार्ड", आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 15:33 IST

Aditya Thackeray Criticize Mahayuti Government's Report Card: महायुतीकडूस सरकारचं रिपोर्टकार्ड सादर करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नाही तर डिपोर्ट कार्ड आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. (Maharashtra Assembly Election 2024)

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर  आज राज्यातील सत्ताधारी महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमधून सरकारचं रिपोर्ट कार्ड समोर ठेवलं. दरम्यान, महायुतीकडूस सरकारचं रिपोर्टकार्ड सादर करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नाही तर डिपोर्ट कार्ड आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. 

महायुती सरकारकडून सादर करण्यात आलेल्या रिपोर्ट कार्डबाबत प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आताच काही क्षणांपूर्वी भाजपा, शिंदे आणि अजितदादा यांनी त्यांचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित केलं आहे. आता महाराष्ट्र या रिपोर्ट कार्डचं नाव बदलून डिपोर्ट कार्ड ठेवणार आहे, असं मला वाटतं. कारण गेल्या दोन वर्षांत त्यांनी महाराष्ट्रातून अनेक गोष्टी डिपोर्ट केल्या आहेत. मग ते उद्योग असोत, त्यात वेदांता फॉक्सकॉर्न असेल, एअरबस-टाटा असेल,  बल्कड्रग असेल, मेडिकल डिव्हाईस पार्क असेल, भाजपाने इथून हलवलेलं इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर असेल किंवा डायमंड मार्केट असेल, अनेक गोष्टी इथून हलवून गुजरातला डिपोर्ट करण्यात आल्या, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मी दसऱ्याच्या दिवशी म्हणालो त्याप्रमाणे महाविकास आघाडीचं सरकार येताच आमचे तीन महत्त्वाचे प्राधान्यक्रम राहतील. त्या म्हणजे रोजगार, रोजगार आणि रोजगार. कारण रोजगारदेखील महाराष्ट्रातून डिपोर्ट करण्यात आले आहेत. तसेच भाजपाच्या राज्यात बेरोजगारी ही सगळीकडे दिसत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Aditya Thackreyआदित्य ठाकरेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी