शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

...असे साकारले ‘गोल्डन ड्रीम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 11:52 IST

Education: फलटणच्या वैशाली शिंदे यांनी २००६-०७ साली सुरू केलेले प्ले स्कूल एव्हाना ज्युनियर कॉलेजपर्यंत पोहोचले आहे. संस्थेत आठशे-हजार मुले आहेत. तरी ती संस्था ‘आयडियल किड्स’ म्हणूनच ओळखली जाते. तसे प्रेम वैशाली यांनी फलटण परिसरात निर्माण केले आहे. त्यांची शाळा ‘इंटरनॅशनल’ म्हणून हाँगकाँगच्या ख्यातनाम संस्थेबरोबर रजिस्टर करण्यात आली आहे.

-दिनकर गांगलफलटणच्या वैशाली शिंदे यांनी २००६-०७ साली सुरू केलेले प्ले स्कूल एव्हाना ज्युनियर कॉलेजपर्यंत पोहोचले आहे. संस्थेत आठशे-हजार मुले आहेत. तरी ती संस्था ‘आयडियल किड्स’ म्हणूनच ओळखली जाते. तसे प्रेम वैशाली यांनी फलटण परिसरात निर्माण केले आहे. त्यांची शाळा ‘इंटरनॅशनल’ म्हणून हाँगकाँगच्या ख्यातनाम संस्थेबरोबर रजिस्टर करण्यात आली आहे. त्याचा फायदा होऊन शाळेतील मुले आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकताना दिसतात. शाळेचा एक मुलगा इशान मेनसे - एलजी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय जाहिरातीत आहे, तर दुसऱ्या दोन मुलांची - वेदांत राऊत आणि रिधीमा साळुंके - आंतरराष्ट्रीय ‘रॅम्प वॉक’साठी निवड झाली आहे. पैकी रिधीमा साळुंके लंडनला जाऊन तिचा दिमाख जाहिरात ‘शो’मध्ये दाखवूनदेखील आली. त्याचबरोबर मिमि खडसे ही चिमुकली अभिनय क्षेत्रात गाजत आहे.

वैशाली शिंदे यांना हे यश त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनातून लाभले, असे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षणकाळात मुलांची सर्वांगीण वाढ व्हावी, कोणाला कोठल्या क्षेत्रात कोणत्या प्रकारची कुशलता असते हे आधीच सांगता येत नाही. मुलांसमोर सर्व संधी उपलब्ध असाव्यात, यादृष्टीने त्यांनी त्यांच्या संस्थेत सोयीसुविधा करून घेतल्या.

वैशाली शिंदे यांचे स्वतःचे शिक्षण माण तालुक्यात कुदळे यांच्या घरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले. त्या म्हणाल्या की, घरी अक्षरशः खाण्यास अन्न नव्हते. म्हणून माझे लग्न फलटणच्या शिंदे यांच्या घरात लावून दिले. मी शिक्षणात सतत सर्वोत्कृष्ट होते व सर्वोत्कृष्ट राहिले - एम. ए. बी. एड्. होईपर्यंत. माझा कधीच दुसरासुद्धा नंबर आला नाही ! वैशाली यांना सासू नव्हती, पण प्रेमळ सासरे महादेव शिंदे होते. त्यांनी वैशाली यांचे सर्व शिक्षण पूर्ण केले. त्याकरिता ते त्यांना शाळा-कॉलेजमध्ये सायकलवर डबलसीटदेखील घेऊन जात. वैशाली यांना स्वयंपाकसुद्धा त्यांनीच शिकवला.

वैशाली यांनी स्वयंप्रेरणेने प्रथम ‘डे केअर’ व ‘प्ले स्कूल’ सुरू केले. ती त्यांची स्वत:ची किंमत होती. त्यामुळेच त्या छोट्या आरंभातून त्यांच्या ‘गोल्डन ड्रीम एज्युकेशन सोसायटी’चा एवढा मोठा व्याप उभा राहिला आहे ! संस्था आहे भाड्याच्या जागेत, संस्थेत पंचावन्न शिक्षिका-शिक्षक आहेत. वैशाली म्हणाल्या की, ते संस्थेचे वैभव असते. वैशाली स्वत: शाळेला दिवसाचे २४ तास देतात. त्या म्हणाल्या, “मे महिन्यातसुद्धा मी व शिपाई मिळून, आम्ही शाळा सुरू ठेवतो. त्यातून मुलांना नवनव्या संधी उपलब्ध करून देता येतात.” 

वैशाली आहेत धाडसी व बेधडक. त्या म्हणतात की, प्रगत तंत्रज्ञान ही आमच्या शाळेची ताकद आहे. त्या जोरावर आम्ही जुन्या, मातब्बर शिक्षण संस्थांसमोर आमचे शिक्षणप्रसाराचे, मुलांमध्ये आधुनिक दृष्टी रुजवण्याचे कार्य सुरू ठेवू शकतो. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण