तीस गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला अटक

By Admin | Updated: November 2, 2016 02:03 IST2016-11-02T02:03:24+5:302016-11-02T02:03:24+5:30

गोळीबार, खंडणीसारख्या तीस गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला मंगळवारी अंबोली पोलिसांनी गजाआड केले.

Thirty arrested suspects arrested | तीस गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला अटक

तीस गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला अटक


मुंबई : गोळीबार, खंडणीसारख्या तीस गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला मंगळवारी अंबोली पोलिसांनी गजाआड केले. त्याच्या अटकेमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. फरीद खान असे अटक आरोपीचे नाव आहे.
अंबोलीच्या राम मंदिर परिसरात खान येणार असल्याची माहिती एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी या परिसरात सापळा रचून खानच्या मुसक्या आवळल्या. खान हा पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या कुख्यात गुंड इदाह याचा लहान भाऊ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खानवर
शहरात खुनाचा प्रयत्न, दंगल, गोळीबारसारखे तीस गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात वाकोला पोलीस ठाण्यातही त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
अंबोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त अरुण चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Thirty arrested suspects arrested