औरंगाबाद : अमेरिकेसह ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले असताना मागील तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातही कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येईल, असे भाकीत मुख्यमंत्र्यांचे सल्लागार तथा ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी व्यक्त केले. ही लाट किती प्रभावी असेल हे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसंवाद फाऊंडेशनच्या ऑनलाईन संवादमालेत डॉ. म्हैसेकर यांनी ‘कोविड मुक्तीचा मार्ग’ या विषयावर मागदर्शन केले. यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोविड ही जागतिक महामारी आहे. त्यातून माणसांना वाचण्यासाठी केवळ तीनच पर्याय उपलब्ध आहेत. यात प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. लस घेतल्यानंतरही चेहऱ्यावर मास्क घातले पाहिजे आणि बाहेर पडताना किमान सहा फुटांचे अंतर राखले पाहिजे.
CoronaVirus News: राज्यात कोरोनाची तिसरी लाट कधी?; 'त्या' भाकितानं सगळ्यांचीच चिंता वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 09:51 IST