उस्मानाबादेत उष्माघाताचा तिसरा बळी
By Admin | Updated: May 29, 2015 01:23 IST2015-05-29T01:23:39+5:302015-05-29T01:23:39+5:30
जिल्ह्णात उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेला असून, गुरुवारी उष्माघाताने आणखी एकाचा बळी गेला. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्णात उष्माघाताने तिघांचे बळी गेले आहेत़

उस्मानाबादेत उष्माघाताचा तिसरा बळी
उस्मानाबाद : जिल्ह्णात उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेला असून, गुरुवारी उष्माघाताने आणखी एकाचा बळी गेला. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्णात उष्माघाताने तिघांचे बळी गेले आहेत़ मेडसिंगा येथील पंडित दगडू
कदम (७५) हे गुरूवारी सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी उस्मानाबाद येथे आले होते़ भाजी खरेदी केल्यानंतर ते गावाकडे जाण्यासाठी देशपांडे स्थानकावर
गेले असता अचानक चक्कर येऊन पडले़ त्यांना उस्मानाबाद
जिल्हा रूग्णालयात दाखल केले़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले़
भूम शहरातील प्रकाश उर्फ पोकाश अजितो चालोक (२२) हा सराफा दुकानात दागिने तयार करण्याचे काम करतो़ प्रकाश बुधवारी दुपारी जेवणासाठी जात होता़ तीव्र उन्हात चालत जाताना त्याला अचानक चक्कर आल्याने तो खाली पडला़ त्याला रूग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले़
दरम्यान, रखरखत्या उन्हात उस्मानाबाद शिवारात झाडे तोडण्याचे काम करणाऱ्या भागवत सिध्दराम क्षीरसागर (६५) यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला़ वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य होत आहे. (प्रतिनिधी)