आॅक्टोबरमध्ये पोलीस भरतीचा तिसरा टप्पा
By Admin | Updated: April 20, 2015 02:06 IST2015-04-20T02:06:18+5:302015-04-20T02:06:18+5:30
: राज्यातील पोलीस भरतीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यात होईल.

आॅक्टोबरमध्ये पोलीस भरतीचा तिसरा टप्पा
अहमदनगर : राज्यातील पोलीस भरतीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यात होईल. त्यात १० ते १२ हजार जागा भरल्या जातील, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे.
सरकारने ६० हजार पोलिसांच्या भरतीसाठी परवानगी दिलेली आहे. त्यासाठी एकूण ५ टप्प्यांत प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यातून २० हजार पोलिसांची भरती झाली. आता तिसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी तयारी सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये किंवा त्यानंतरच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ताज्या दमाचे जवान पोलीस दलात आल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी फायदा होईल. शिवाय पोलीस दलावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.