शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या मुंबईत रायगड-पेण ग्रोथ सेंटर; एक लाख कोटीची गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 06:54 IST

दावोसमधील एकॉनॉमिक फोरमवरून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, दावोस: तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करतानाच तेथे पहिल्या टप्प्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून त्यासाठीचे करारदेखील झाले आहेत, अशी घोषणा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

येथील जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत असलेले फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई विमानतळापासून १५-२० किमीवर ग्रोथ सेंटर उभारले जाईल.  या ठिकाणी ‘प्लग ॲण्ड प्ले’ या धर्तीवर ‘रेडी टू स्टार्ट’ पद्धतीने लगेच कामकाज सुरू होईल. ही देशातील पहिली कंपनी, यामध्ये खासगी – सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) प्रकल्प असणार आहे. या ठिकाणी नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करत असून ग्लोबल कॅपेसिटी सेंटर्स, फिनटेकची इको सिस्टिम तयार होईल. 

फडणवीस व बर्मुडा देशाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांच्यात चर्चा झाली.  ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम यांनी फडणवीस यांची भेट घेत पुणे येथील प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले.

या विदेशी कंपन्या येणार

हवाना ग्रुप, एसएसबी ग्रुप, एन्सार, फेडेक्स, रिव्हर रिसायकल समूह, एमजीएसए समूह, स्पेसेस होल्डिंग मेपल ट्री, जीनव्ही आणि इंडोस्पेस पार्क समूह, अमेरिकेतून ट्रिबेका डेव्हलपर्स या विदेशी कंपन्यांच्या गुंतवणूकीतून एक खूप चांगले शहर तयार होईल.

वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती

महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे, असे नमूद करून या वर्षाच्या अखेर पर्यंत १६ गिगा वॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अदानी समूह महाराष्ट्रात ६६ अब्ज डॉलर्स गुंतवणार

  • जागतिक आर्थिक परिषदेच्या ५६ व्या वार्षिक बैठकीत अदानी समूहाने आगामी ७ ते १० वर्षांत महाराष्ट्रात तब्बल ६६ अब्ज डॉलर्स (सुमारे ५.५ लाख कोटी रुपये) गुंतवण्याची घोषणा बुधवारी केली.
  • विमान वाहतूक, हरित ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक उत्पादन क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार असून, यामुळे राज्यात लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.
  • महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी गुंतवणुकीची गरज आहे, त्यामुळे अदानी समूह असो वा अन्य कोणी, गुंतवणुकीचे आम्ही मनापासून स्वागत करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची भूमिका स्पष्ट केली.

नेमकी गुंतवणूक कुठे?

३,००० मेगावॅट क्षमतेचे ग्रीन डेटा सेंटर पार्क, विमानतळाजवळ एक एकात्मिक एरिना जिल्हा, कोल गॅस्टीफिकेशन सुविधा, ८,७०० मेगावॅटचे पंप-स्टोरेज जलविद्युत प्रकल्प आणि सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट्स यामध्ये अदानी समूह गुंतवणूक करणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raigad-Pen Growth Center in Third Mumbai; ₹1 Lakh Crore Investment

Web Summary : Raigad-Pen declared a Growth Center near Navi Mumbai airport, attracting ₹1 lakh crore investment. Adani Group pledges ₹5.5 lakh crore in Maharashtra for infrastructure and green energy. The state aims for 16 GW solar power by year-end.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaigadरायगड