मालेगावच्या महापौरपदी तिसरा महाजचे इब्राहिम
By Admin | Updated: December 11, 2014 01:55 IST2014-12-11T01:55:17+5:302014-12-11T01:55:17+5:30
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी तिसरा महाज प्रणित मालेगाव तिसरी आघाडीचे हाजी मोहंमद इब्राहिम मोहंमद यासीन यांची निवड करण्यात आली

मालेगावच्या महापौरपदी तिसरा महाजचे इब्राहिम
मालेगाव (नाशिक) : मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी तिसरा महाज प्रणित मालेगाव तिसरी आघाडीचे हाजी मोहंमद इब्राहिम मोहंमद यासीन यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शहर विकास आघाडीचे मोहंमद युनूस शेख ईसा यांची निवड करण्यात आली. हाजी इब्राहिम यांना तिसरा महाज - 2क्, शिवसेना आघाडी - 11, राष्ट्रवादी - 8, मनसे - 2 व पाच अपक्ष अशी एकूण 46 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात शिवसेना आघाडीचे 12 तसेच माजी महापौर मलिक शेख असे तेरा नगरसेवक हे तटस्थ राहिले. त्यामुळे मोहंमद युनूस ईसा यांना तिसरा महाज - 2क्, राष्ट्रवादी - 8, मनसे - 2 व चार अपक्ष अशी एकूण 34 मते मिळाली.