राज्य हौशी नाट्यस्पर्धेची तिसरी घंटा नोव्हेंबरमध्ये
By Admin | Updated: August 4, 2015 00:55 IST2015-08-04T00:55:30+5:302015-08-04T00:55:30+5:30
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५५व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा नोव्हेंबरमध्ये वाजेल. या स्पर्धेची

राज्य हौशी नाट्यस्पर्धेची तिसरी घंटा नोव्हेंबरमध्ये
पुणे : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५५व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा नोव्हेंबरमध्ये वाजेल. या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील विविध केंद्रांवर १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, ३१ आॅगस्टपर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
हौशी मराठी नाट्य स्पर्धेबरोबरच १३व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ७ डिसेंबरपासून राज्यातील एकूण पाच महसुली विभागांत आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय संगीत तसेच हिंदी आणि संस्कृत भाषेतील नाट्य स्पर्धा डिसेंबर व जानेवारीदरम्यान होणार आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नाट्य संस्थांनी ६६६.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील प्रवेशिका भरून पाठवणे आवश्यक आहे. डीडी व आवश्यक कागदपत्रांसह ३१ आॅगस्टपर्यंत संचालक, सांस्कृतिक कार्य जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ या पत्त्यावर या प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)