तिसरी आघाडी, नव्हे आता ‘समिती’
By Admin | Updated: October 4, 2014 01:31 IST2014-10-04T01:31:00+5:302014-10-04T01:31:00+5:30
राज्यातील पुरोगामी, डाव्या व रिपब्लिकन चळवळीत पक्ष व संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या आघाडीला ‘समिती’ असे नाव आहे.

तिसरी आघाडी, नव्हे आता ‘समिती’
>मुंबई : राज्यातील पुरोगामी, डाव्या व रिपब्लिकन चळवळीत पक्ष व संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या आघाडीला ‘समिती’ असे नाव आहे. ही समिती राज्यातील सर्व जागा लढणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस एस.व्ही. जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र लोकशाही डावी आघाडी व संविधान मोर्चा या 18 पक्षांच्या ‘समिती’ने प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ यांना सोबत घेत 288 जागा लढण्याचा निर्धार केला आहे. त्यात आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला 125 जागा सोडण्यात आल्या असून समितीने 163 जागांवर लढण्याचे निश्चित केल्याचे जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, समितीमधील शेकाप, शिवराज्य पक्ष आणि सत्यशोधक ओबीसी पक्षाला 55 जागा सोडण्यात आल्या आहेत. यामधील शिवराज्य पक्ष व सत्यशोधक ओबीसी पक्षाने शेकापच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर रिपब्लिकन सेनेला 35, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 35, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 2क्, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) 9 आणि जनता दल (से) ला 9 जागांचे वाटप करण्यात आले आहे.
‘केवळ मुख्यमंत्री कोणाचा या मुद्दय़ावर महायुती फुटल्याचे सर्व जनतेने पाहिले आहे. मोदी लाट आता ओसरली असून चार महिन्यांत लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. आघाडीचा भ्रष्टाचार आणि महायुतीने केलेल्या भ्रमनिरासामुळे लोक नक्कीच तिस:या आघाडीला पसंती देतील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले, ‘समितीत सामुदायिक नेतृत्व होणार असून सर्व नेते एकमेकांच्या प्रचारसभेत सामील होतील.’ या वेळी भाकपचे प्रकाश रेड्डी, शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष सुधीर सावंत आणि अन्य नेतेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)