पदवीची तिसरी कट आॅफ आज
By Admin | Updated: June 22, 2015 03:14 IST2015-06-22T03:14:02+5:302015-06-22T03:14:02+5:30
कला, विज्ञान आणि वाणिज्यसह व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची तिसरी कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर होणार

पदवीची तिसरी कट आॅफ आज
मुंबई : कला, विज्ञान आणि वाणिज्यसह व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची तिसरी कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या कट आॅफ लिस्टमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांनाही २२ जूनपर्यंत प्रवेश फी भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
या आधी १८ जूनला पदवी अभ्यासक्रमाची दुसरी कट आॅफ लिस्ट जाहीर झाली होती. त्यात नाव आलेल्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी २० जूनपर्यंतची मुदत होती. मात्र १९ जूनला झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक बदल केला आहे. तिसऱ्या यादीत विद्यार्थ्यांना २४ जूनपर्यंत आवश्यक कागदपत्रे आणि फी भरता येणार आहे.
व्यवसायिक अभ्यासक्रमांची कट आॅफ घसरणार का?
पारंपरिक अभ्यासक्रमांचा पहिल्या दोन्ही कट आॅफचा टक्का घसरला होता. याउलट व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या दोन्ही कट आॅफचा टक्का वरच राहिला होता. परिणामी तिसऱ्या यादीत व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या कट आॅफचा टक्का घसरणार का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असेल.