तेरावी आॅनलाईन प्रवेशाला विद्यापीठाचा हिरवा कंदील
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
बारावी निकालानंतर खोळंबून राहिलेल्या तेरावी प्रवेश प्रक्रियाला अखेर मुंबई विद्यापीठाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.

तेरावी आॅनलाईन प्रवेशाला विद्यापीठाचा हिरवा कंदील
मुंबई: बारावी निकालानंतर खोळंबून राहिलेल्या तेरावी प्रवेश प्रक्रियाला अखेर मुंबई विद्यापीठाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. १४ जूनपासून तेरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून प्रत्येक विद्यार्थ्याला नोंदणी अनिवार्य असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
याआधी विद्यापीठ प्रशासनाने प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणीच्या यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध कंपन्यांकडून निविदा मागविल्या होत्या. त्यामुळे बारावीचा निकाल लागूनही प्रवेशाची तारीख विद्यापीठाने जाहिर केली नव्हती. अखेर मागविलेल्या निविदांवर निर्णय घेत आॅनलाईन प्रवेश नोंदणीची तारीख विद्यापीठाने सोमवारी जाहिर केली. यानुसार तेरावी आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेची सुरुवात १४ जूनपासून होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून विद्यापीठाने कला, वाणिज्य आणि विज्ञान (अनुदानित आणि विनाअनुदानित ) या विद्याशाखांतील अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणी अनिवार्य केले आहे. त्यामुळे तिन्ही विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असेल. या प्रवेश प्रक्रियेसंबंधीची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर १२ जून रोजी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क कुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली. (प्रतिनिधी)
>आॅनलाईन
प्रवेशाचे वेळापत्रक
अर्ज विक्री :
२६ मे ते १४ जून
प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया : १४ जून ते २१ जून
इन हाऊस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश :
७ ते २१ जून
फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख : १८ ते २२ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी : २२ जून (सायंकाळी ६ वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा : २३ व २४ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
दुसरी गुणवत्ता यादी :
२४ जून (सायंकाळी ६ वा)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा : २५ व २६ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
तिसरी गुणवत्ता यादी:
२६ जून (सायंकाळी ६ वा.)
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणा :
२७ व २८ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)